महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव
उमरखेड तहसीलदार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उमरखेड तालुक्यातील महसूल विभागातील तलाठी मंडळ अधिकारी कृषी सहाय्यक ग्रामपंचायत सचिव रोजगार सेवक कोतवाल 1 ऑक्टोंबर 2021पिक विमा करीता एक दिवस विशेष मोहीम दिनांक १.१०.२०२१ सर्व सन्माननीय शेतकरी बांधवांसाठी राबविण्यात आली , ज्या शेतकऱ्यांनी सन 2021-22 या वर्षी पीक विमा भरलेला आहे व पिकाचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांनी पिकाचे नुकसान झाल्याबाबत चे आपले तक्रार अर्ज मोबाईल app द्वारे ऑनलाईन दाखल करावेत. तसेच ज्या शेतकऱ्यांचा अर्ज ऑनलाईन होत नसेल त्यांनी सदर खालील नमुन्यात ऑफलाईन अर्ज खालील आदेशात नमुद नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचारी यांचे कडे दिनांक 1 ऑक्टोबर 2021 रोजी आपल्या गावातच सादर करावेत. असे आव्हान उमरखेड चे तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी शेतकऱ्यांना आव्हान केला होता सतत पडत असलेल्या पावसा मध्ये शेतकऱ्यांचा अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालेले आहे करीता शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात आला होता त्या आवाहनाला प्रतिसाद देत अमडापूर येथील तलाठी राहुल भोजने कुरळी येथील तलाठी स्वातीताई गावंडे ईसापुर येथील कृषी सहाय्यक जे .एम .कदम टाकळी येथील सचिव विनोद चव्हाण रोजगार सेवक ईश्वर राठोड कोतवाल योगेश मारकवार यांनी शेतकऱ्यांना जनजागृती करून
अर्जासोबत विमा भरल्याची पावतीची झेरॉक्स आधार कार्ड झेरॉक्स व बँकेचे पासबुक ची झेरॉक्स सोसायटी कर्ज द्वारा असेल तर त्यांचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र सादर करावेत.
ही विशेष मोहीम दिनांक . 1 ऑक्टोंबर 2021 रोजी राबविण्यात आली या मोहिमेला चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना अमडापूर येथील तलाठी राहुल भोजने व जे़ एम.कदम . कृषी सहाय्यक यानी शेतकऱ्यांना खचून न जाता आम्ही तुमच्या सोबत आहोत असे त्याने मनोगत व्यक्त केले यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रेमसिंग राठोड, भारत़ जाधव .प्रमोद जाधव, राम राठोड, मोहन जाधव .ग्रामपंचायत सदस्य संदेश मोरे, इंदल सिंग राठोड ,शंकर चव्हाण, विनोद चव्हाण, सोमा चव्हाण, व शेतकरी बांधव उपस्थित होते.
0 टिप्पण्या