मोहन कळमकर
गुरूर ब्रम्हा गुरूर विष्णू , गुरू देवो महेश्वरा,
गुरू साक्षात परब्रम्ह तस्मेश्री गुरवेय नमः
गुरू म्हणजे शिक्षकाची महती संागतानी असे म्हटले आहे की, गुरू चे स्थान हे देवाहुन ही वरचे आहे. भारतीय संस्कृती मध्ये शक्षकांना मोठे आणि मानाचे स्थान असुन पिढी घडवण्याचे सामर्थ हे शिक्षकांमध्ये असते. असेच गुरूवर्य, आदर्श शिक्षक, हरिभक्त, स्वामी पेंडसे गुरूजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नामदेव गोपेवाड सर यांचा नियत वयोमानानुसार सेवा निवृत्ती चा कार्यक्रम शाळेच्या प्रागंणात आज दिनंांक 30 सप्टेंबर रोजी पार पडला आणि माजी विद्यार्थींनी सरांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
शिस्तप्रिय तसेच प्रेमळ व्यक्तीमत्व म्हणुन सरांचा परिचय ढाणकी व परिसरात आहे. मराठी भाषेवर असलेले प्रभुत्व आणि इतिहास शिकवताना दिलेले दाखले यामुळे सरांनी शिकवलेले आज पण विध्यार्थ्यांच्या लक्षात पक्के आहे. अध्यात्माची जोड शिक्षणाला देत भाषेची आवड सरांनी विध्यार्थ्यांना लावली. गरिबीचे चटके सहन करत सरांनी आपले शिक्षण पुर्ण केले आणि ढाणकी मध्येच शिक्षक म्हणुन रूजु झाले त्यामुळे परिस्थीतीची जाण असल्यांने सरांनी कधिही कुण्याही विध्यार्थ्यांवर आर्थिक ताण येवु दिला नाही. एखाद्या जवळ फि भरण्यासाठी पैसे नसतील तर सरांनी स्वता ब-याच वेळा आपल्या खिशातुन पैसे दिले मात्र कोणाचेही नुकसान होवु दिले नाही असे माजी विध्यार्थ्यानी बोलताना सांगीतले.
विध्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी, त्यांची बुद्धी प्रलब्ध व्हावी आणि त्याने आदर्श व्यक्ती म्हणून समाजात ताठ मानेन जगावं या उद्देशाने संस्कार सौरभ सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातुन सरांचे कार्य निरंतर पणे सुरू होते आणि आहे. सरांच्या छत्रछायेत अनेक विद्यार्थी घडले, काही शासकीय सेवेत, काही व्यवसायात तर काही वेगवेगळया क्षेत्रात आपले नाव कमवत असुन सरांचे नाव मोठे करत आहेत.
सेवानिवृत्तीच्या या सोहळयाला शिक्षक आमदार सरनाईक यांनी आवर्जुन हजेरी लावुन गोपेवाड सरांचा सपत्नीक सन्मान केला आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला. या वेळी गावातील सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते आणि त्यांनी सरांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. सरांच्या सेवेनिवृत्तीमुळे उपस्थितांचे अलगतच डोळे पाणावले होते. कार्यक्रमाला ढाणकी शहराचे नगरअध्यक्ष, उपाध्यक्ष, नरसेवक, प्रतिश्ठित नागरीक, शालेय शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रामाच्या शेवटी सेवानिवृत्त मुख्याध्यापक नामदेव गोपेवाड सर यांनी उपस्थितांचे आभार मानले व उपस्थितांनी सुध्दा सरांच्या आरोग्यमय जिवनासाठी शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या