सावळेश्वर परिसरात पैनगंगेचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात. पिकांचे अतोनात नुकसान.

 



मोहन कळमकर,  मो 7385861446 

मागील दोन दिवसापासून होणाऱ्या पावसामुळे सर्व नदी पात्रांची पाणी पातळी वाढली असून त्याचा फटका आता शेतकऱ्यांना बसत आहे.  तालुक्यातील सावळेश्वर परिसरात जवळून वाहणाऱ्या पैनगंगा नदीचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसले असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

गुलाबी चक्री वादळाचे केंद्र बिंदू उमरखेड तालुका असल्याने ढाणकी व सावळेश्वर परिसरात वरुणराजा धोधो बरसला मात्र या मुळे हाता तोंडाशी आलेला घास हिसकावून गेला.  उभ्या सोयाबीन मध्ये गुडघा भर पाणी साचल्याने शेतकऱ्यां डोळ्यात पाणी आले.  या गंभीर स्थितीवर शासन सुद्धा योग्य ते पाऊल उचलत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.  दोन दिवसापूर्वीच सोयाबीन ला योग्य भाव मिळावा साठी ढाणकीत आंदोलन करण्यात आले होते मात्र अद्यापही शासनाने काहीही ठोस पावले नसल्याने पुन्हा आंदोलन करावे का हा मोठा प्रश्न आहे.

दिवाळीचा सन जवळ आला असताना उभ्या सोयाबीन मध्ये पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले असून येणारे सण कसे साजरे करायचे याची चिंता लागली आहे.  ज्या पिकाच्या भरवश्यावर कर्ज घेतले तेच पीक पाण्यात असल्याने आता कसे होणार हा मोठा प्रश्न बळीराज्या पुढे आ वासून उभा आहे. तरी या गंभीर परिस्थिती मध्ये आता शासनाने आधार म्हणून सरसकट कर्जमाफी,  हेक्टरी 50000 हजार रुपये मदत,  व ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सावळेश्वर परिसरातील शेतकरी करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या