रात्र होताच डॉक्टर गायब. ब्राह्मणगाव येथील प्रकार. गंम्भीर रुग्णांची होत आहे हेळसांड .


ब्राह्मणगाव प्रतिनिधी -संदीप पेंटेवाड 

तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे सध्या रात्री च्या वेळी खाजगी तसेच सरकारी डॉक्टर चे मिळणे अवघड झाल्याने रात्री अपरात्री गंभीर रुग्णांना उमरखेड जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. ब्राह्मणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा असाच प्रकार सुरु असल्याची नागरिकात चर्चा असून सायंकाळीच वैद्यकीय अधिकारी गायब होत असल्याने नागरिकांची हेळसांड होत आहे.  शासकीय रुग्णालयात रात्र पाळी साठी एका वैद्यकीय अधिकाऱ्याने राहणे गरजेचे असताना सुद्धा या नियमाला केराची टोपली दाखवण्याचा प्रकार सध्या सुरु असून वरिष्ठ या कडे दुर्लक्ष करत आहेत.  

वातावरणाच्या बदलामुळे गावात रोगराई पसरू शकते अश्या वेळी आरोग्य यंत्रणेने सज्ज राहायला हवे मात्र ढिसाळ नियोजनाने गावकऱ्यांमध्ये रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्याच प्रमाणे सेवेचे व्रत घेतलेले खाजगी डॉक्टर सुद्धा सायंकाळच्या वेळी रुग्ण तपासण्याचे टाळत असल्याने नागरिकांमध्ये रोष असून संबन्धितावर कारवाई ची मागणी जोर धरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या