ढाणकी प्रतिनिधी -
मोबाईल मुळे आजचे जगणे सुखकर झाले आहे. सगळे कामे मोबाईल मुळे होऊ लागल्याने माणसात आळशी पणा वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याच प्रमाणे अति मोबाईल च्या वापराने लहान मुलात सुद्धा शारीरिक व्यंग वाढत असल्याने पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
कोरोना काळात शाळा बंद असल्याने शासनाने ऑनलाईन शिक्षण हा पर्याय निवडला, साहजिकच ऑनलाईन शिक्षण म्हटल्यावर मोबाईल किंवा काम्पुटर चा वापर आला. आणि शिक्षणाबरोबर लहान मुल गेम खेळणे, सिनेमा पाहणे यात सुद्धा आपला वेळ तास न तास मोबाइल च्या स्क्रीन वर घालवू लागल्याने डोळ्यांचे व मणक्याचे आजार वाढू लागले आहेत. ढाणकी त सुद्धा काही लहान मुलामध्ये मोबाईल च्या अति वापरामुळे डोळ्यात तिरळे पणा आल्याने पुन्हा एकदा मोबाईल चर्चेचा विषय झाला आहे.
कोणत्याही गोष्टी चा अतिरेक झाला कि त्याचे दुष्परिणाम हे दिसतातच. मोबाईल सुद्धा मर्यादेत वापरला तर खूप महत्वाची वस्तू आहे मात्र अतिरेक केला तर जीवावर सुद्धा उठू शकते. उमरखेड पारिसरात मागील काही दिवसा पूर्वी असाच एक मुलगा पब जी गेम मुळे वेडा झाल्याची घटना घडली होती. त्यामुळेच या मोबाईल च्या वेडेपनावर पालकांनी लक्ष देणे आता गरजेचे झाले आहे.
मोबाईल चा अतिवापरामुळे डोळे, तिरळे होणे, कमी दिसणे, मणका दुखणे, प्रसंगी वेड सुद्धा लागू शकते. त्या मुळे पालकांनी जागरूक राहून पाल्यांच्या मोबाईल वापरावर मर्यादा लावणे गरजेचे आहे.
डॉ स्वाती मुनेश्वर
वैदयकिय अधिकारी,
प्राथमिक आरोग्य केंद्र ढाणकी
0 टिप्पण्या