महागाव प्रतिनिधी -संजय जाधव
महागाव महसुल विभागा अंतर्गत येत असलेल्या फुलसावंगी येथे तलाठी सजा नं.८० आहे. फुलसावंगी हे महसुल विभागाचे मंडळ आहे. येथे एक मंडळअधिकारी व मंडळा अंतर्गत येत असलेल्या फुलसावंगी तलाठी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी मोहीम राबवून शेतकर्यांच्या सातबारावर पेरा वर पिक नोंदणी करून दिल्याने शेतकरी वर्गाला मोठी मदत झाली आहे.
फुलसावंगी महसुल मंडळा अंतर्गत राहुर,शिरपुली, शिरमाळ,काळी, टेंभी, चिल्ली, चिंचोली ,पिंपळगाव, वरोडी व वडद या गावाचा समावेश होतो. या गावातील शेतकऱ्यांना भेटून ज्याचे पीकपाणी नोंदणी झालेली नाही अशा शेतकऱ्यांची भेट घेऊन फुलसावंगी येथील तलाठी पिक पेरा नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नोंद करत आहे . बऱ्याच शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन नाही त्यामळे त्यांना ऑनलाईन पीक पेरा अपडेट्स करण्यासाठी मोठी अडचण येत होती तेव्हा फुलसावंगी च्या तलाठीनी ही अडचण लक्षात घेऊन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पेरा नोंद केली.
शेतकरी आपल्या शेतात विविध पिकाची लागवड करतात त्यामुळे शासनाने 'माझी शेती, माझा सातबारा, मी नोंदविनार पिकांचा पेरा ' ही हे अभियान राबविले आहे. तलाठी आणि मंडळ अधिकारी स्वतः शेतकऱ्या जवळ जाऊन पीक पेरा नोंदवत असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
0 टिप्पण्या