ढाणकी प्रतिनिधी
ढाणकी शहरातील भुसार व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते असलेले रुपेश भंडारी यांची उमरखेड तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष पदी नियुक्ती 20 ऑक्टोबर रोजी उमरखेड zकृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात काँग्रेस कमिटीच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात नियुक्ती करण्यात आली. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दत्तराव शिंदे यांनी पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना वेळोवेळी पक्ष हिताच्या दृष्टीने कार्य करावे, ग्रामीण भागात काँग्रेस पक्षाचे विचार पोहचवणे, सर्व जाती धर्मातील लोकांना पक्ष संघटनेत सामावून घेणे, पक्ष वाढी करीता प्रयत्न करणे, उमरखेड तालुक्यातील व्यापारी आडते मापारी हमाल यांच्याशी समन्व्य करून पक्षाची भूमिका ध्येय धोरण रुजविन्या बाबत सुचवले.
रुपेश किशोरचंद भंडारी हे नेहमीच सार्वजनिक कार्यात पुढे असतात. तसेच गरजू लोकांसाठी त्यांचा मदतीचा हात नेहमी पुढे असतो. त्यांची सामाजिक कार्याची आवड बघून त्यांना ही जबाबदारी पक्षाकडून देण्यात आली.
यावेळी कृषी उत्त्पन्न बाजार समिती सभापती बाळासाहेब चंद्रे संचालक बाळासाहेब भट्टड, संचालक गोपाळ अग्रवाल, संचालक दत्तराव रावते, संचालक कृष्णा पाटील देवसरकर, उमरखेड तालुका काँग्रेस महिला अध्यक्ष रक्षा ताई माने , ढाणकी काँग्रेस शहर अध्यक्ष अमोल तुपेकर, सुभाष कुचेरिया, मारोतराव रावते, यासह इतर हि काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या