बिटरगाव बु व नारळी येथे शहीद जवान यांना श्रद्धांजली.


महागाव प्रतिनिधी  :- संजय जाधव

उमरखेड तालुक्यातील छोट्याशा गावातील नारळी येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ४नागपूर एसआरपीएफ च्या आस्थापने वरील  सशस्त्र पोलीस शिपाई दामू लखा आडे मुळगाव नारळी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ दिनांक २० एप्रिल १९९३ रोजी पोलीस मदत केंद्र मंगेझरी जिल्हा गोंदिया येथे कर्तव्यावर असताना भूसुरुंग स्फोटात शहीद झाले होते.

त्या अनुषंगाने २१ ऑक्टोबर पोलीस शहीद दिन असल्याने त्यानिमित्त शहिदांचे स्मरण करून  त्याची वीर पराक्रम माहिती लोकांपर्यंत पोहोचणे व शहिदांना मानवंदना देऊन श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नागपूर येथील सशक्त राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ४ नागपूर एसआरपीएफ च्या वरील सशस्त्र पोलीस शिपाई शहीद डि. यल. आडे नारळी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ दिनांक २० एप्रिल १९९३ रोजी पोलीस शहीद दिन असल्याने त्यानिमित्त शहिदांचे स्मरण करून  नागपूर येथील सशक्त पोलीस बल गट क्रमांक 4 पोलीस उपनिरीक्षक दीपक नामदेव तायडे ,धीरज कुमार, रामदास नंदागवळी.सशस्त्र पोलीस नाईक श्री शशांक शेवडे सशस्त्र पोलीस शिपाई यांची उपस्थितीत दिनांक 20/10/2021 रोजी नारळी या गावांमध्ये शहीद जवान  डि .यल .आडे यांना  श्रद्धांजली देन्यात आली  या कार्यक्रमाला शहिदांना मानवंदना देण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन सशस्त्र पोलीस दल क्रमांक  4नागपूर यांच्यातर्फे करण्यात आले होते यावेळी नारळी गावातील प्रतिष्ठित नागरिक अविनाश जाधव ,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक उमरखेड,नारळी येथील सरपंच संजय बरडे उपसरपंच बीबीचंद राठोड ग्रामपंचायत सदस्य नाईक कारभारी वगावातील नागरीक  उपस्थित होते.

बिटरगाव पोलीस स्टेशन तर्फे शहीद जवानांना श्रद्धांजली.

   बिटरगाव पोलीस स्टेशन येथे नारळी येथील शहीद जवान डी. एल. आडे यांना सशस्त्र पोलीस बल क्रमांक 4 नागपूर  व बिटरगाव पोलीस स्टेशन तर्फे शहीद जवान डी. एल. आडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप भोस ,उपनिरीक्षक कपिल मस्के , गजानन खरात, रवी गिते, दत्ता कुसराम ,सचिन चव्हाण, विद्या राठोड, भालेराव, केंद्रे व बिटरगाव पोलिस स्टेशनचे कर्मचारी हजर होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या