महावितरणची नवीन रेल्वे वसाहतीच्या बांधकामावर धडाकेबाज कारवाई. मागील १८ महिन्यापासून होत होती विज चोरी सबंधित कंत्राटदारास अंदाजे २० लाखाचा दंड लागल्याची शक्यता.

 


दाऊ गाडगेवाड हिमायतनगर प्रतिनिधी 

हिमायतनगर शहरातील रेल्वे स्थांनकाच्या समोर मागील दोन वर्षा पासून बांधण्यात येत आलेल्या रेल्वे वसाहतीच्या बांधकाम सबंधित डी.एम. दहीफळे व विवेक इंजीनियरिंगच्या कंत्रादारांकडून केले जात होते त्याकामावर फुले नग येथील गावठाण विद्युत रोहीत्रावरून आलेल्या लघुखांब वाहिनीच्या  हेंद्रे यांच्या घराजवळील पोला वरून डायरेक्ट हुक लाऊन दिवसाला जवळपास 26.5 किलो व्याट वीज चोरी केली जात असल्याची माहिती सबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यावर त्यांनी ह्या रेल्वे वसाहतीच्या बांधकामावर धडक कारवाई करत घटना स्थळी  सापडलेल्या काळा पिवळा रंगांचा सर्व्हिस वायर अंदाजे किंमत 600 ,काळ्या निळ्या रंगाचा सर्व्हिस वायर अंदाजे किंमत 600 व कीट कॅट 3 नग अंदाजे किंमत 300 असा माल जप्त करून  आज दि.20 ऑक्टोंबर रोजी दुपारी  सहायक अभियंता  पवन भडंगेसह वायरमन विशाल जेजरवाड यांनी कार्यवाही केली.

      या बाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील रेल्वे स्थानका समोर केंद्र सरकारच्या करोडो रुपयाच्या निधीमधून मागील दोन वर्षा पासून नवीन रेल्वे वसाहतीच्या अंदाजे १०० खोल्ल्यांचे बांधकाम केल्या जात आहे  या कामाला लागणारी वीज संबंधीत कंत्राटदाराकडून शहरातील फुले नगर येथील  विद्युत रोहीत्रावरून आलेला लघुखांब वाहिनीच्या हेंद्रे यांच्या घराजवळील पोल वरून डायरेक्ट हुक लाऊन दिवसा ढवळ्या राज रोस पने जवळ पास दिवसाला 26.5 किलो व्याट वीज चोरी केली जात असल्याचे उघड झाले आहे.  त्यामुळे मागील दोन वर्षापासून होत असलेली विज चोरी स्थानिक नागरिक व  वार्ताहरांनी येथील महावितरण कंपनी च्या अधिकाऱ्यांना  लक्षात  आणून दिल्यानंतर हिमायतनगर येथील महावितरण अधिकाऱ्यांच्या गलथान कारभाराची  पोलखोल शोषल मीडियावर झाली. त्या नंतर त्यांनी आज दि २० ऑक्टोंबर रोजी दुपारी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला व सबंधित डी.एम. दहीफळे व विवेक इंजीनियरिंग  यांच्या वर वीज चोरी प्रकरणी दंड लाऊन कार्यवाही करणार असल्याचे सह्हायक अभियंता पवन भडगे साहेब यांनी उपस्थित प्रतिनिधींना सांगितले.    

     येथील रेल्वे वसाहतीवर  काम करत असलेल्या कामगारांना वीज चोरीच्या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली तेव्हा उपस्थित पत्रकांरांनी होत असलेल्या बांधकामाची पाहणी केली तेव्हा तेथे मिटर नसल्याचे आढळून आले पण तिथे लाईट होती हा सर्व प्रकार पाहिल्या नंतर शेजारच्या शेतामधील खांबावरून वीज चोरी होत असल्याचे उघड झाले आज घडीला बघीतल्या गेल्यास ग्रामीण भागातील नागरीकांसह शेतकरी वर्गाला व शहरातील सर्वसामान्य नागरीकांना आवश्यकतेनुसार विज पुरवठा होत नाही. सतत महावितरण कडून विज पुरवठा खंडीत केल्या जातो ह्याचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरीकांना विजेचे बिल भरताना  येत आहे.  एक महीना जर विजेचे बिल थकीत राहिले तर महावितरणकडून विज पुरवठा खंडित करण्याची नोटीस येते पण आता ह्या कंत्रादारांवर कोणता गुन्हा दाखल केल्या जाईल ? व त्यांना महावितरण कंपनी किती दंड लावेल ? ह्याकडे मात्र सर्व जनतेचे लक्ष लागले आहे 

             

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या