पुण्यश्लोक अहिल्या बाई होळकर विद्यालयात वन्यजीव सप्ताह साजरा.


ढाणकी प्रतिनिधी - 

गांजेगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयात वन्यजीव सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला. 

वन विभागा कडून दर वर्षी एक ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर वन्यजीव सप्ताह पळाला जातो.  या वर्षी  हा सप्ताह गांजेगाव येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यालयात साजरा करण्यात आला.   सप्ताहाचे औचित्य साधतं विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा,  वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या आणि त्यात विद्यार्थ्यांनी देखील उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. 

यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी ओमप्रकाश पेंदोर यांनी वन्य जिवनाबद्दल विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या भाषेत महत्व सांगितले.  राउंड ऑफिसर अजय राऊत व एम. बि घोडमारे  यांनी वन्य जिवांबद्दल दुर्मिळ अशी माहिती सांगून  विद्यार्थ्यांच्या मनात वन्यजीवा बद्दल आवड निर्माण केली. व वन्यजिवांचे संरक्षण व संवर्धनाचे महत्व पटवून दिले. 

यावेळी शाळेतील  कर्मचारी हुलकाने, सुरपाम,  झुकझुके, गंगरपाड, वन कर्मचारी प्रकाश पाईकराव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी  सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र वाटप करण्यात आले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या