एक हात मदतीचा, महागाव तहसीलचे कर्मचारी सरसावले पुढे , आपणही अनाथाचे नाथ होवूया.


महागाव प्रतिनिधी :-संजय जाधव

यवतमाळ जिल्ह्य़ातील महागाव तालुक्यातील गुंsss,ज साझ्या तील सारकिन्ही गाव.हरिदास वय 10, कोमल वय 8, कुणाल वय 6 या चिमुकल्यांचे वडिल शिवाजी डाखोरे सन 2018 साली आत्महत्या केली. मजूरदार असल्याने शासकीय लाभ भेटला नाही.आई गिरजाबाई या चिमुकल्यांना घेउन माहेरी तीन वर्षे राहीली, भावांचा आधार न मिळाल्याने ऑगस्ट 2021 ला परत सासरी आली. संजय गांधी निराधार योजनेची आवश्यक कागदपत्र तयार करून दि.9/9/2021 ला तहसील महागाव येथे सादर केलेत आणि अवघ्या विस दिवसानंतर आई गिरजाबाई किरकोळ आजारी पडली व वैद्यकीय उपचाराकरिता पैसे नसल्याने ती देखील दि.29/9/2021 ला मरण पावली. आता  ही छोटी छोटी बालके उघड्यावर पडली असून कुटूंबात 65 वर्षाची  आजी जी कोणताही कामधंदा करण्यास असमर्थ असल्याने नाईलाजास्तव ही बालके लोकांचे शेतात किलो दोन किलो कापूस वेचायला जावून आपली गुजरान करित आहेत. ही बाब महागाव तहसील चे तलाठ्यांना समजताच दिवाळीपूर्वी या अनाथांना कपडेलते घेउन व दिवाळीचे मिष्टान्न घेउन त्यांना मदतीचे आश्वासन दिले.सरकार मोफत राशन देत आहे .आज उपाशी कोणीही मरत नाही.कुत्रे मांजरे देखील आपले पोट भरतात मग तर ही निरागस बालके सुद्धा आपली पोट भरतील.पण आज त्यांचे भविष्य अंधकारमय झाल्यागत दिसून येत आहे.

दुःखात व दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थणेला जोडलेल्या दोन हातापेक्षा उपयुक्त व श्रेष्ठ असतो. आजया अनाथ मुलांना व त्यांच्या वृद्ध जिला मदतीची नितांत गरज आहे. आम्ही या बातमी द्वारे समाजाला आव्हान करतो की, शक्य होईल तेवढी कृपा करून मदत करा. आणि त्या निरागस लेकरांच्या जीवनामध्ये हास्याचे दोन क्षण आना.

मदतीकरिता 

सेंट्रल बँक ऑफ सवना

IFSC cODE: CBIN0282049

Ac no.5162367208 मो नं 8766693809

Name.  शांताबाई मारोती डाखोरे या अकाउंटला पैसे पाठवून आपण अनाथाच्या नाथ होऊ शकता असे आव्हान महसूल विभाग व तलाठी संघटनेतर्फे करण्यात आलेला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या