शेकडो कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशासह भाजपा उमरखेड कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न.

 


संजय जाधव महागाव 

दिनांक २४ ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टी उमरखेड शहराची कार्यकर्ता संवाद बैठक राजस्थानी भवन उमरखेड येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे अध्यक्षस्थान भाजपा यवतमाळ जिल्हाध्यक्ष श्री नितीनभाऊ भुतडा यांनी भुषवले. या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणुन भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री प्रफुल्लजी चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. या बैठकी मध्ये उमरखेड शहरातील विविध प्रभागामधील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश घेतला. उमरखेड शहरातील गुणवंतांचा सत्कार देखील या प्रसंगी मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी आमदार श्री नामदेवराव ससाणे, माजी आमदार श्री राजुभाऊ नजरधने, जिल्हा सचिव श्री महेशजी काळेश्वरकर , शहराध्यक्ष श्री अजयजी बेदरकर सर, भाजपा न.प.उमरखेड निवडणुक प्रभारी श्री दत्त दिगंबर वानखेडे ,माजी शहराध्यक्ष श्री संजयजी भंडारे, अन्न सुरक्षा महामंडळाचे सदस्य श्री सुरेशजी काळे,न.प. सभापती श्री दिलीपराव सुरते, न.प. सभापती श्री प्रकाशराव दुधेवार सर, न.प. सभापती श्री बाळासाहेब नाईक, न.प. सभापती सौ. सविताताई पाचकोरे, न.प. सभापती सौ. अनुप्रिताताई देव, न.प. सभापती सौ. कविताताई मारोडकर , महिला शहर अध्यक्षा सौ. अल्काताई मुडे, माजी नगराध्यक्षा सौ. अरुणाताई दवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उमरखेड न. प. ने केलेल्या विकास कामांची सविस्तर माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष    श्री नितीनभाऊ भुतडा यांनी दिली तसेच आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांविषयी भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री प्रफुल्लजी चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

आमदार श्री नामदेवराव ससाणे , माजी आमदार श्री राजुभाऊ नजरधने , जिल्हा सचिव श्री महेशजी काळेश्वरकर, श्री दत्तादिगंबरजी वानखेडे, श्री दिलीपराव सुरते यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष श्री अजयजी बेदरकर सर यांनी केले, सुत्र संचालन शहर सरचिटणीस श्री विशाल गिरी सर यांनी व  आभार प्रदर्शन अ. जा. आघाडी अध्यक्ष श्री सुधाकरराव लोमटे सर यांनी केले.

कार्यक्रमात  भाजप महिला आघाडी ,युवा मोर्चा, वाहतूक आघाडी ,ओबीसी आघाडी ,वैद्यकीय आघाडी सर्व प्रकोष्ठ तथा सेल चे शेकडो कार्यकर्ता बंधू व भगिनी पदधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या