दाऊ गाडगेवाड -हिमायतनगर प्रतिनिधी
हिमायतनगर शहरात नुकतीच एकाच वर्गात शिकत असलेल्या काही मुलांनी मिळून आपल्याच वर्ग मित्राची शुल्लक कारणावरून हत्या केली. याचे पडसाद ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परीणाम झाल्याचे दिसून आले. भयभीत झालेल्या पालकांना त्याचे मनोबल उंचावण्यासाठी व आपल्या पाल्याच्या शैक्षणिक उज्ज्वल भवितव्यासाठी आपली महत्वपूर्ण भूमिका विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देऊ शकते. आपल्या पाल्याची शिस्त, सामाजिक संस्कार, वर्तन विचार इत्यादी विषयावर पालक शिक्षक भेट चर्चासत्र प्रगती गंगाई कोचींग क्लासेस येथे आयोजित करण्यात आली होती.
पालकांनी पाल्याच्या सुरक्षेची भीती मनातुन काढुन टाकावी. मुलं, मुली शाळा, महाविद्यालय तसेच जिथे शिकवणी चालू आहे तेथील शिक्षकांशी पालकांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाल्याच्या गुणवत्तेविषयी चर्चा करावी. मोबाईलचा अति वापरही विद्यार्थ्यांच्या जिवनावर विपरीत परीणाम घडवून आणू शकतो त्यामुळे मोबाईलचा वापर हा गरजेपुरताच करण्यात यावा. पालकांनी आपपल्या मुला, मुलींवर लक्ष केंद्रीत केले पाहीजे कारण आपले पाल्य शिक्षणाच्या व्यतीरिक्त काय करत असतात याचीही माहीती पालकांना असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना घडवण्यात जेवढे शिक्षकांचे योगदान आहे त्यापेक्षाही जास्त पालकांचे योगदान जास्त आहे कारण पालक हे त्यांचे पहीले गुरू आहेत, पालकांपासूनच प्रत्येक मुला,मुलींना संस्कार मिळतात. अशा अनेक विषयावर पालक शिक्षक चर्चा सत्रामध्ये पाल्याच्या भवितव्याविषयी आपल्या मुला, मुलींचे उज्वल भवितव्य साकारण्यासाठी सखोल चर्चा करण्यात आली. प्रगती गंगाई कोचिग क्लासेचे प्रा संदीप हरडपकर सर, कदम सर, मिर्झा सर, संतोष हरडपकर सर, नागेश कोथळकर सर, प्रशांत सुर्यवंशी सर, साई कोथळकर सर, नरवाडे सर, अंकुश मिराशे सर यांनी पालक शिक्षक चर्चा सत्र घडवून आणले व यश मिराशेच्या हत्येनं भयभीत झालेल्या पालकांच्या मनातील भीती दुर करण्यास मदत मिळाली.

0 टिप्पण्या