हिमायतनगर नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन कामाची निविदा प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे व नियमानुसारच - मुख्याधिकारी डी.एन.गायकवाड

 


दाऊ गाडगेवाड- हिमायतनगर प्रतिनिधी 

          हिमायतनगर नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन कामासाठी दि. ३० ऑगस्ट २०२१ ते ०७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत ई-निविदा (पहिली वेळ) मागविण्यात आल्या होत्या. सदर ई-निविदा भरतांना दि. ०७ सप्टेंबर २०२१ रोजी काही तांत्रिक अडचण येत असल्यामुळे ई-निविदा भरण्यासाठी कालावधी वाढवून द्यावा किंवा फेरनिविदा मागविण्यात यावी, अशी काही कंत्राटदार यांनी नगरपंचायतीस विनंती केली होती. सदर कालावधीत एकूण पाच निविदा प्राप्त झाल्या होत्या. परंतु जास्तीत जास्त निविदाधारकांना संधी मिळावी या उद्देशाने सदर निविदा प्रक्रिया रद्द करून दि.१० सप्टेंबर २०२१ ते १७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत फेरनिविदा मागविण्यात आल्या. सदर कालावधीत मे.नागराल इंडिया प्रा.लि., टेरामेर इंडिया प्रा.लि., बेरार इंजिनिअरींग प्रा.लि., बी.के.एन.एस.एस. अमरावती, श्री नागरिक सेवा सहकारी संस्था व पल्लवी इंटरप्रायजेस या एकूण सहा निविदा प्राप्त झाल्या आहेत. सदरील निविदांची तांत्रिक तपासणी केली असता मे.नागराल इंडिया प्रा.लि., टेरामेर इंडिया प्रा.लि. व बेरार इंजिनिअरींग प्रा.लि. हे तीन निविदाधारक निविदेतील अटी व शर्तीनुसार पात्र ठरलेले आहेत. बी.के.एन.एस.एस. अमरावती हे निविदेतील चार अटी व शर्तीची, श्री नागरिक सेवा सहकारी संस्था हे निविदेतील पाच अटी व शर्तीची व पल्लवी इंटरप्रायजेस हे निविदेतील तीन अटी व शर्तीची पूर्तता करू न शकल्यामुळे त्यांच्या निविदा अपात्र ठरलेल्या आहेत. सदर घनकचरा व्यवस्थापन कामाची निविदा प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शकपणे व नियमानुसार झालेली असून, या मध्ये कुठल्याही प्रकारची अनियमितता झालेली नसल्याचे मुख्याधिकारी डी.एन.गायकवाड यांनी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या