आरोग्य आणि शिक्षण दोन्ही विभाग नगरपंचायत कडे वर्ग करण्याची मनसे ची मागणी .

 


 ढाणकी प्रतिनिधी 

 ढाणकी नगरपंचायत होऊन तीन वर्षाचा कार्यकाळ होत आला परंतु पाहिजे तसा नगर पंचायत  हद्दीतील शासकीय कार्यालय अध्याप पर्यंत नगरपंचायत कडे वर्ग करण्यात आले नाही नागरिकांनी खूप मोठ्या अपेक्षा नगरपंचायत झाल्यापासून ठेवल्या होत्या,  मात्र नागरिकाचा भ्रमनिरास होत आहे नागरिकाचा अत्यन्त जिव्हाळ्याचा विषय असलेला सरकारी दवाखाना नगरपंचायत झाल्यापासून वाऱ्यावर दिसून येत आहे सरकारी दवाखान्याची अवस्था माय वाढत नाही बाप जेऊ घालत नाही याप्रमाणे झाल्याचे दिसत आहे. सरकारी दवाखान्याची मालकी अध्याप पर्यंत जिल्हापरिषेदे कडे आहे मात्र ढाणकी शहर कोणत्याही जिल्हा परिषेदेच्या गणा मध्ये येत नाही. त्यामुळे कोणत्याही जिल्हा परिषद सदस्याचे लक्ष ढाणकी आरोग्य केंद्राकडे नाही. आरोग्य केंद्रातील सोयी सुविधे करीता नागरिकाला वारंवार रस्त्यावर उतरावे लागत आहे. यापेक्षा अवस्था जिल्हा परिषद शाळेची चांगली नाही. जिल्हा परिषद शाळे मध्ये आज रोजी फक्त गोरगरीब नागरिकांचे पाल्य  शिक्षण घेत आहेत. त्यांच्या मुळे जिल्हा परिषदेच्या शाळा कश्या तरी तग धरून आहेत. जिल्हा परिषेदेच्या शाळेची मालकी सुद्धा जिल्हा परिषेदे कडे असल्याने शाळेला कोणीही वाली दिसत नाही. सर्व सामान्य जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध असलेले दोन्ही घटक आज वाऱ्यावर सोडण्यात आले आहेत त्यामुळे मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनां तुन दोन्ही विभाग जिल्हा परिषेदे कडून काढून नगरपंचायत कडे देण्याची मागणी जिल्हा अध्यक्ष मनसे देवभाऊ शिवरामवार,  मनविसे जिल्हा अध्यक्ष अनिल हमदापुरे, उपजिल्हा अध्यक्ष डेव्हिड शहाणे उमरखेड तालुका अध्यक्ष शेख सादिक, मुकुंद जोशी सिद्धार्थ घुगरे,  हिरासिंग चव्हाण, तोसिफ भाई, दत्ता पिलवड,  मुन्ना रहेमान यांनी मागणी केली. 

  


 ढाणकी ग्रामपंचायत जाऊन नगरपंचायत आल्याने जिल्हा परिषेदेच्या मालकीचे दोन्ही विभाग आरोग्य आणी शिक्षण नगरपंचायत कडे वर्ग होतील असे वाटत आस्त्ना तीन वर्षाचा कार्यकाळ लोटून जात आहे परंतु अध्याप पर्यंत नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे दोन्ही विभाग नगरपंचातला प्रशासनाने वर्ग केलेले नाहीत लवकरात लवकर शिक्षण आरोग्य दोन्ही विभाग नगरपंचायती कडे वर्ग करावे अन्यथा नगरपंचायत समोर आंदोलन करण्यात येईल. 

         शेख सादिक 

 तालुका अध्यक्ष मनसे उमरखेड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या