मोहन कळमकर, ढाणकी.
शासनाच्या शून्य नियोजनामुळे आणि निसर्गाच्या फटक्या मुळे सोयाबीन ला आता अल्प दर मीळत आहे. सुरवातीला कधी नाही मीळाले ते भाव मीळत होते. मात्र जसे जसे शेतकऱ्यां चे सोयाबीन काढणीस आले तसे तसे सोयाबीनचे दर कोसळत गेले. सोयाबीन पिकांचे ऊतरते भाव पाहुन शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी येत आहे. सोयाबीन पीकाला योग्य प्रमाणात दर मिळाला पाहिजे याकरीता ढाणकी येथील शेतकरी व सर्व पक्षीय नेते एक झाले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल माने, माजी पंचायत समिती सभापती संजय कुम्बरवार, नगरपंचायत उपाध्यक्ष जहीर जमीनदार, जिन प्रेस मानद सचिव हरिभाऊ दिलेवार, शिवसेना किसान आघाडी तालुका अध्यक्ष गणेशराव नरवाडे, मनसे तालुका अध्यक्ष शेख सादिक, युवासेना तालुका अध्यक्ष संभाजी गोरटकर, ढाणकी शिवसेना शहर प्रमुख बंटी जाधव, प्रहार तालुका अध्यक्ष शेख माजिद, व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष गजानन मिटकरे, दीपक पाटील, चंद्रे ओमराव चंद्रे, रुपेश भंडारी, अवधूत पाटील चंद्रे, दीपक रावते,नितीन येरावार, मारोतराव पाटील रावते, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष विजय वैध्य, सैयद जाकीर, स्वप्नील पराते, मारोतराव रावते, सदाशिव पिंपरखेड, मनोज रामटेके, सखाराम माने, यासह इतर शेतकऱ्यांनी बैठक घेऊन ढाणकी बंद चा निर्णय घेतला. यावेळी संजय कुम्बरवार यांनी मार्गदर्शन करताना प्रत्येक राजकीय नेता आपल्या भाषणातून भारत हा कृषी प्रधान देश आहे म्हणून बोलत असतो परंतु शेतकऱ्यावर वेळ आल्यास कोणीही त्याच्या हक्का करीता लढा देत नाही. शेतकऱ्याच्या सोयाबीन येण्याच्या वेळेस दर निचांक पातळीवर जात आहेत ज्याप्रकारे सोयाबीन च्या भावात मंदी येत आहे तशी मंदी दुसऱ्या कोणत्याही वस्तूची होताना दिसत नाही. जो प्रयन्त सोयाबीन पिका ला योग्य प्रमाणात भाव मिळत नाही तो प्रयन्त शेतकऱ्याच्या पाठीशी राहील त्याकरिता जेल मध्ये जावं लागलं तरी चालेल. तर
नगरउपाध्यक्ष जहीर जमीनदार यांनी सोयाबीन किंवा इतर पिकाचे भाव ठरविण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणा मुळे सोयाबीन पिकाचे भाव कोसळत आहेत, जोपर्यंत केंद्रसरकार यांनी आयात केलेले सोयपेंड रद्द करत नाहीत तोपर्यंत सोयाबीन पिकाचे भाव वाढणार नाहीत. त्याकरिता मी सद्य्व शेतकऱ्याच्या पाढीशी राहील असे मत व्यक्त केले. यावेळी शिवसेना ढाणकी प्रमुख बंटी जाधव, रुपेश भंडारी यांनी सुद्धा आपापले मनोगत व्यक्त केले.
शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला योग्य प्रमाणात भाव मिळण्या करीता दिनांक 28 सप्टेंबर रोजी ढाणकी बंद आणी चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा देत निवेदन बिटरगाव पोलीस स्टेशन कर्मचारी सतीश चव्हण यांना दिले.
सोयाबीन पिकाला योग्य भाव मिळाला पाहिजे याकरिता शेतकऱ्यांनी पुकारलेल्या दिनांक 28 सप्टेंबर रोजी पुकारलेल्या ढाणकी बंदला विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष यांनी समर्थन दिले आहे.


0 टिप्पण्या