जेष्ठ साहित्यीक मा.बाबाराव मडावी यांनाआदिवासी साहित्य रत्न व जीवनगौरव पुरस्कार प्रदान.

  


उमरखेड तालुका प्रतिनिधी:-मारोतराव गव्हाळे 

आदिवासी गोलमेज परिषद,महा.राज्य या गृपच्या माध्यमातुन मा.बाबाराव मडावी,यवतमाळ (साहित्यीक,विचारवंत तसेच सामाजीक कार्यकर्ते) यांना आदिवासी साहित्य रत्न व जीवनगौरव पुरस्कार-2021 तसेच 11000 रु.देऊन गौरवीण्यात आले.

आदिवासी गोलमेज परिषद,महा.राज्य चे मुख्य संचालक *मा.भारत टारफे,विक्रीकर अधिकारी,जालना* यांच्या कल्पनेतुन हा पुरस्कार,प्रमाणपत्र,मानचिन्ह सोबतच 11000 रुपये नगदी असे याचे स्वरुप आहे.

मा.बाबाराव मडावी यांचे आकांत-आत्मकथन,टाहो-कादंबरी,पाखरं-कवितासंग्रह,भाकर-कथासंग्रह,मी युध्द पुकारले-कवितासंग्रह,आदिवासीसाहित्य शोध आणी समीक्षा-वैचारीक ग्रंथ,आक्रोश-टाहो चे हिंदी रुपांतर,रमाई-चरित्र,तसेच विविध वृत्तपत्र व मासीकात बरेच लेख प्रसिध्द झालेत.

त्यांना आज पर्यंत बर्‍याच पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.त्यांचे साहित्य सावित्रीबाई विद्यापीठ पुणे,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद,स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठ नांदेड,अमरावती विद्यापीठ ,नागपुर विद्यापीठ येथे त्यांचे साहीत्य बी.ए.व एम.ए.ला अभ्यासक्रमात सहभागी झाले आहेत.त्यांच्या साहित्यावर बरेच संशोधक पि.एच.डी.व एम.फील करीत आहेत.

साहित्य लेखनाबरोबरच त्यांनी सामाजीक कार्यातही भरीव योगदान दिले आहे.त्यांनी विविध आंदोलने,मोर्च्यात नेतृत्व सुध्दा केले आहे.विविध सामाजीक संघटनेत त्यांनी पदाधाकारी म्हणुनही कार्य केले आहे.विविध संमेल्लने,मेळावे,मोर्चे या ठीकाणी आदिवासि व बहीजनांना संबोधीतहि केले आहे.

मा.बाबाराव मडावी यांना हा पुरस्कार मिळाला म्हणजे नक्कीच भारत टारफे साहेब यांनी त्याचा खर्‍या अर्थाना सन्मान केला आहे.बाबाराव मडावी यांना हा पुरस्कार मिळाल्यामुळे साहित्यीकात आनंद निर्माण झाला आहे.सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.त्यांना डाॅ.सखाराम डाखोरे मुंबई,सुनिल गायकवाड जळगाव,रमजान तडवी जळगाव,शितल ढगे पुसद,नितीन टेकाम,डाॅ.वाल्हेकर,डाॅ.राजेश धनजकर परभणी,राजेश ढगे पुसद,रामकृष्ण चौधरी पुसद,शंकर बळी,मुंबई यासह महाराष्ट्रातील साहित्यीकांनी मा.बाबाराव मडावी यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या