महाराष्ट्रातील ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवकांना ग्रामपंचायत सेवेत कायम करा तहसीलदारांन मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन.

 


दाऊ गाडगेवाड -हिमायतनगर प्रतिनिधी 

   महाराष्ट्रातील ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवकांची संख्या २८१४४ एवढी असून राज्य सरकारने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत ग्रामसभेतून ग्राम रोजगार सेवकांची ग्रामसभेद्वारे नियुक्तीचे आदेश दिले त्यानुसार राज्यामध्ये सन २००६ पासून आज पर्यंत राज्यात एकूण २८ हजार १४४ रोजगार सेवक शासनाच्या प्रशासकीय खर्च रोजगार सेवकांना शासनाच्या  निधीतून ६% टक्के मानधनावर कार्यरत असून सन २००६ पासून गेल्या पंधरा वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर ग्राम रोजगार सेवक म्हणून काम करतात.

  पण प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत पॅनलच्या माध्यमातून नवीन ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांची निवड होते,  राज्यातील बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये  सत्तांतर झाल्यावर सूडबुद्धीने ग्राम रोजगार सेवक यांच्यावर खोट्या  प्रोसेडिंग द्वारे कामावरून कमी करून जाणीवपूर्वक अन्याय केला जातो. त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर असून त्यामुळे ग्राम रोजगार सेवकांना मानसिक त्रास होऊन कोणत्या निर्णयाला सामोरे जावे लागते व त्यांच्या  कुटुंबाची पालन पोषणाची जिम्मेदारी कुटुंब प्रमुख म्हणून रोजगार सेवकांवर असल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते व त्यांच्यावर अन्याय होतो हे सत्य आहे.

               माननीय महोदय आपणास विनंती की एकूण २८ हजार १४४ ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवक यांना ग्रामपंचायत स्तरावर कायम करण्याचा निर्णय घेऊन राज्यातील सर्व ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवकांना ग्रामपंचायत सेवेत कायम करून न्याय द्यावा ही नम्र विनंती.  अन्यथा दिनांक ०२/१०/२०२१ रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्रातील सर्व तहसील कार्यालयासमोर सकाळी ठीक: 10:00  वाजेपासून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल असे रोजगार सेवक आणि रामकिशन लकडे, सुनिल जाधव, संजय वाडेकर,  शेख मुजीबुर रहमान रोजगार हमी तालुका अध्यक्ष यांनी आमच्या पत्रकारांशी बोलताना सांगितले..  

हिमायतनगर तालुक्यातील कामगार संघटनांणा गोर सेना चा जाहीर पाठिंबा पाठिंबा देते वेळेस गोर सेना हिमायातनगर टीम सह उपस्थित सर्व ग्रामपंचायतीचे ग्राम रोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या