दाऊ गाडगेवाड -हिमायतनगर प्रतिनिधी
आरोग्य विभागाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या हॉल तिकीट पासून सुरू झालेला गोंधळ आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे व ढिसाळ नियोजनामुळे अखेर परीक्षा आज रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली आहे. राज्य सरकारने बोगस (एजन्सी) संस्थेच्या हातात परीक्षेचा कारभार दिल्यामुळे विद्यार्थ्यांना अत्यंत मनस्ताप सहन करावा लागला आहे. अचानक परीक्षा रद्द करून महाराष्ट्रातील लाखो गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना आर्थिकदृष्ट्या नुकसानीत टाकलेल आहे. बरेच विद्यार्थी परीक्षेचे सेंटर इतर जिल्ह्यात आसल्यामुळे अडचणीच्या काळात सुद्धा प्रवास खर्च करून पोहोचलेले असताना ऐनवेळी परीक्षा रद्द करणे याला आरोग्य विभागाचा गलथान कारभार जबाबदार आहे. या सर्व प्रकारची व बोगस एजन्सीची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे.
सर्व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे झालेले आर्थिक नुकसान लक्षात घेऊन त्यांना भरपाई म्हणून सर्व परीक्षा देणाऱ्याना खर्च झालेला प्रवास भत्ता राज्य सरकारने त्वरित द्यावा. अशी मागणी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.

0 टिप्पण्या