दाऊ गाडगेवाड -हिमायतनगर प्रतिनिधी
कोरोना विषाणुच्या संसर्गाने देशातील शाळा, महाविद्यालय बंद होऊन दिड वर्षा पेक्षाही जास्त कालावधी लोटला आहे. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण कोलमंडले आहे. आता कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.
शाळा, महाविद्यालये बंद असल्याने ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवनमान खालावत चालले आहे. अनेक विद्यार्थी त्यांच्या जीवनाचला कलाटनी देणारे वर्षच वाया गेल्याने नैराश्याच्या आहारी जात आहेत. नैराश्यामुळे देशात अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली प्रकरणेही समोर आली आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्याला जबाबदार कोण ? या प्रश्नाचे उत्तर अद्याप कोणालाच देता आले नाही.
पहीली ते पाचवी पर्यंतच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची तर फारच वाईट परीस्थिती पहायला मिळत आहे. ज्या वयात आयुष्याची बाराखडी गिरवायची आहे त्या वयात रस्त्यातील धुर आणि चिखलात खेळताना सैरा- वैरा झालेले दिसून येत आहेत. आणखी किती दिवस शासन शाळा महाविद्यालये बंद ठेवणार आहेत.
शासनाने आँनलाईन शिक्षण चालू केले पण या आँनलाईन शिक्षण पद्धतीचा किती विद्यार्थ्यांना फायदा झाला तर शासन चुकीची आकडेवारी देत आहे. ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना या पद्धतीचा थोडाही उपयोग घेता आला नाही, यापुढेही घेता येत नाही. कारण ग्रामिण भागात प्रत्येकाकडे आजही स्मार्ट मोबाईल फोन नाहीत. ज्यांच्याकडे आँनराईड मोबाईल फोन आहेत त्यांना इंटरनेटचे नेटवर्क नाही याकडे शासनाने कधी लक्ष दिलेच नाही.
. किमाण ग्रामिण भागात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे सर्वेक्षणातुन निदर्शनास येत आहे. त्यामुळे शासनाने वरील बाबी लक्षात घेऊन ग्रामिण भागातील तरी शाळा महाविद्यालये सुरू करण्यात यावी अशी विनंती आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी निवेदनाद्वारे शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे केली आहे. शाळा महाविद्यालये सुरू नाही केली तर ही नवयुवकांची पिढी उद्धवस्त झाल्याशिवाय राहणार नाही. याला सर्वस्वी केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार राहील.

0 टिप्पण्या