दाऊ गाडगेवाड -हिमायतनगर प्रतिनिधी
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सगळीकडे पाणीचं पाणी दिसत आहे. ग्रामिण भागाकडील रस्त्यांवरील पुलांसह महामार्गावरील पुलांची दयनिय अवस्था बनली असून पर्यायी पुलांवरून नद्या, ओढ्यांचे पाणी वाहत असल्याने तालुक्यात ठिकठिकाणी वाहतुक विस्कळीत झाली आहे. या परीस्थितील येथील नेतृत्व करत असलेले आमदार, खासदार, जिल्हा परीषद सदस्य, पंचायत समिती सदस्य हेच प्रामुख्याने जबाबदार आहेत. यांच्यामुळेच कंत्राटदार वाट्टेल तसे काम करून जनतेला वेठीस धरत आहेत.
हिमायतनगर तालुक्यात केवळ पुलाचं नाही तर रस्त्यांची पण दुर्दशा कंत्राटदारांनी केली आहे, ग्रामिण भागाकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकर नावालाचं केले आहे. आणि संपुर्ण निधी हडप केला असल्याचे त्यांच्या कामावरून दिसून येत आहे. असे काम कुणामुळे होत आहे तर या भागाचे नेतृत्व करत असलेले लोकप्रतिनिधी म्हणजेच खासदार, आमदार, जिल्हा परीषद सदस्यचं कारणीभूत आहेत. जर का अशा घटनांमध्ये एखाद्या नागरीकाचा बळी गेला तर लोकप्रतिनिधींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ सुर्यंवंशी यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितले.

0 टिप्पण्या