सुवर्ण पदक मिळवलेल्या राजकुमार जाधव यांचे सेवानगर येथे मोठ्या उत्साहात स्वागत.


महागाव प्रतिनिधी -संजय जाधव 

महागाव तालुक्यातील सेवानगर कासारबेहळ येथील राजकुमार भिकू जाधव उर्फ लाखा यांची हरियाणा येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 22 वयोगट  महाराष्ट्र कबड्डी टीम मध्ये निवड झालेली होती.रोहतक हरीयाना येथे झालेल्या कंबड्डी स्पर्धेत त्याने सुर्वण पदक मिळवला त्याबद्दल सर्व गावकऱ्यांकडून व वसंत क्रिडा मंडळा कडुन मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले व त्याला पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.

अतिशय मेहनत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर, घरची हलाखीची परिस्थिती असतानासुद्धा कोणत्याही सोयीसुविधा नसताना. . ग्रामीण भागातील युवकांसाठी  आदर्श व प्रेरणास्थान ठरलेल्या राजकुमार भिकू जाधव यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल व सुवर्णपदक मिळविल्याबद्दल त्यांचे संपूर्ण परीसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

राजकुमार हे गोर गोर सेना तालुका अध्यक्ष आजेशभाऊ जाधव यांचे लहान भाऊ आहे. यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सेवानगर येथे झाले .त्यानंतर पाचवी ते बारावी माध्यमिक शिक्षण एच ई एस हिवरा येथे झाले .आणि सध्या तो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीत B.com 2 nd Year करीत आहे.अतिशय गरीब परिस्थितीतून त्यांचे शिक्षण झाले असून आई शिलाईमशीन काम करून व बाबा शेत मजुरी कुरुन राजकुमार चे शिक्षण पूर्ण केले .व राजकुमार ला हरियाना येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिडा  स्पर्धेत पाठविले. राजकुमारला लहानपणापासूनच कबड्डी ची आवड असल्याने व सेवानगर येथे दरवर्षी वसंत क्रीडा मंडळ यांच्या वतीने कबड्डी या स्पर्धेचे आयोजन करत असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाली म्हणून त्यांची संपूर्ण जिल्हाभर प्रशंशा होत आहे.

त्याच्या या यशाचे श्रेय त्यांनी आपल्या आई वडीलांना व त्यांचे प्रशिक्षक मा.सागर सेरे सर यांना दिले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या