पल्लवी इंटरप्रायजेसचे कंत्राट रद्द झाल्याने राजकीय पुढाऱ्यांना दणका.

 


दाऊ गाडगेवाड -हिमायतनगर प्रतिनिधी

हिमायतनगर शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न नेहमीच चर्चेचा विषय  राहीला आहे. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्याने स्वच्छतेचे ७ लाख रूपये बजट होते. परंतु आडीच वर्षे झाल्यानंतर नव्याने नगरपंचायतीत सत्तेत आलेल्या राजकीय पुढाऱ्यांनी जुने कंत्राट रद्द करून नांदेड येथील पल्लवी इंटरप्रायजेसला तब्बल प्रतिमहीना १५ लाख रूपयाला कंत्राट देण्यात आले होते. ही एक विचार करण्यासारखी गोष्ट होती.

              प्रतिमहीना १५ लाख रूपये देऊन सुद्धा शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न सुटला नाही. नाल्यांची साफसफाई नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यांवर साठत आहे, किंबहुना हेच आळ्या आणि डासांनीयुक्त घाण पाणी अनेक नागरीकांच्या घरात शिरल्याने रात्र-रात्र जागून काढावी लागली.  घाणीने शहरात झपाट्याने साथीचे रोग पसरण्यास मदत झाली. कोरोना विषाणुचा काळ असताना  शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर पडला आहे. तरीही राजकीय पुढाऱ्यांसह पल्लवी इंटरप्रायजेसला काहीच फरक पडला नाही. उलट त्यांना ह्या बाबीची मजा वाटत होती आणि बजट सगळे मिळून वाटून घेत होते. 

              स्वच्छतेच्या नावाखाली बोंबाबोंब करून शहराला घाणीचे साम्राज्य बनवल्याने नागरीकांसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सरदार खान पठाण, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी, शिवसैनिक विठ्ठलभाऊ ठाकरे यांनी   पल्लवी इंटरप्रायजेसच्या विरोधात  आक्रमक भुमिका घेतल्याने अखेर पल्लवी इंटरप्रायजेसचे कंत्राट रद्द करण्यात आले.  स्वच्छतेचे बजट ७ लाखावरून १५ लाख केल्याने स्वत:चे घर भरण्याचे काम राजकीय पुढाऱ्यांरी करत होते. आता हे कंत्राट रद्द झाल्याने स्वच्छतेच्या नावाखाली स्वत:चे घर भरणाऱ्या राजकिय पुढाऱ्याना चांगलाच दणका बसला असल्याची चर्चा शहरात नागरीकांकडून ऐकायला  मिळत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या