दाऊ गाडगेवाड -हिमायतनगर प्रतिनिधी
सामाजिक कार्यासाठी मिळणारा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन चा पुरस्कार कोरोना काळतील उत्कृष्ट कार्याबद्दल उंबरविहीरा या पाटोदा तालुक्यातील गावचे रहिवासी सुशील जालिंदर तांबे यांना जाहीर झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की पाटोदा येथील सामाजिक कार्यकर्ते सुशील तांबे यांनी मार्च महिन्यात आलेल्या दुसऱ्या कोरोना लाटेत पाटोदा तालुक्यात महत्त्वपूर्ण योगदान देऊन अनेक लोकांचे प्राण वाचवण्याचे काम केले. त्यांनी स्वतःचा किंवा आपल्या परिवाराचा विचार न करता तालुक्यातील लोकांसाठी दिवस रात्र काम करून लोकांना योग्य उपचार, हॉस्पिटल ला दाखल करणे, कोरोना पेशंट च्या बरोबर आलेल्या लोकांना जेवण देणे, लोकांना टेस्टिंग साठी घेऊन जाणे तसेच जिथे अँम्बुलंस नाही अश्या ठिकाणी स्वतःच्या दुचाकी गाडीवर कोरोना पोजिटिव्ह लोकांना हॉस्पिटल ला आणून सोडले. तसेच त्यांचा मुलांना घरपोहोच जेवण देणे,मनोरुग्ण लोकांना जेवण पाणी वाटप, पाटोदा तालुक्यातील लोकांना मास्क वाटप व मोबाईल हेल्प लाईन सुरू करून ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देणे असे अनेक कामे केली. याची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड व वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी घेतला. व आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी कमिटमेंट अवॉर्ड जाहीर करण्यात आला. या बद्दल त्यांचे पूर्ण महाराष्ट्रातुन कौतुक होत आहे.

0 टिप्पण्या