ढाणकी प्रतिनिधी-
महाराष्ट्राच्या विज क्षेत्रातील कामगार संघटना पैकी तांत्रिक कामगारांचे प्रश्न,अडचणी प्रशासन कडून सोऊन घेत असताना नेहमीच सामाजिक कार्यात देखील अग्रगण्य असलेली मोठी संघटना म्हणजे विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटना.,2019 मध्ये कोल्हापूर,सांगली,सातारा व कोकण मध्ये महापूर आला तेव्हा या संघटनेने एक दिवसाच्या पगार व्यतिरिक्त 4लाख 55 हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी दिला. त्या नंतर कोरोणा पहिली लाट आली तेव्हा सुधा 15 लाख 13 हजार रुपये दिले व या वर्षी कोल्हापूर,सातारा,सांगली सह काही भागात महापूर आला तेव्हा सुधा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष श्री,रवी दादा बाराई,केंद्रीय सरचिटणीस श्री,रवी देवकांत साहेब यांनी गरजेच्या वस्तू पुरग्रस्तांना वाटप केल्या व महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नामदार डॉक्टर नितीनजी राऊतयांना 6लाख 46 हजार रुपये चेकने मुख्यमंत्री सहाय्यता निधी करिता नुकतेच दिले. मागील वर्षी कोरोना पहिली लाट आली तेव्हा याच संघटनेने महाराष्ट्रात कुठेही रक्ताची कमतरता भासू नये या उद्देशाने सामाजिक बांधिलकी म्हणून 04 सप्टेंबर2020 रोजी संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त पूर्ण महाराष्ट्र भर रक्तदानाचे आयोजन करून 7हजार चे वर कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले,त्याच प्रमाणे या वर्षी सुद्धा कोरोना 03 री लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असल्यामुळे पुन्हा रक्ताचा पुरवठा कमी पडू नये म्हणून या संघटने च्यां केंद्रीय नेतृत्वाचे आदेशावरून संघटनेच्या वर्धापन दिनी 04 सप्टेंबर 2021 रोजी पूर्ण महाराष्ट्र सह यवतमाळ जिल्ह्ातील यवतमाळ,पुसद,पांढरकवडा विभाग मध्ये सुद्धा 04 सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.या रक्तदान शिबिराचे यवतमाळ येथील उदघाटन महावितरण चे अधिक्षक अभियंता श्री,मडावी साहेब,यांचे हस्ते व श्री, वैधे साहेब का,अभी,यांचे प्रमुख उपस्थित तसेच पुसद येथील श्री,आडे साहेब कार्यकारी अभियंता,आणि पांढरकवडा येथील श्री,वैद्य यांचे हस्ते उदघाटन होणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त कामगारांनी या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेऊन रक्तदान करावे असे आव्हान प्रा,उपा,श्री, बिहाडे,झोन उपा,श्री,मानकर यांचे सह महावितरण/महा पारेषण जिल्हा यवतमाळ मधील सर्व स्तरीय पदाधिकारी/सभासद व अमरावती झोन अध्यक्ष श्री संजय पडोळे यांनी आवाहन केले आहे.

0 टिप्पण्या