तालुका प्रतिनिधी :-मारोतराव गव्हाळे उमरखेड
बिटरगाव पोलीस स्टेशन चे नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार प्रताप भोस व उपनिरीक्षक कपिल मस्के यांचा आज प्रेस संपादक पत्रकार सेवा संघातर्फे सत्कार करण्यात आला. भोस हे नव्यानेच बिटरगाव पोलीस स्टेशन ला रुजू झाले आहेत. संघटनेच्या सदस्यांशी बातचीत करताना ठाणेदार भोस यांनी ढाणकी येथील पत्रकारांचे कौतुक केले. व विधायक कार्यासाठी माझा नेहमीच विविध कार्यात सहभाग राहील असे सांगितले. तसेंच आगामी येणाऱ्या सणासुदीला सामाजिक एकोपा कसा राहील अश्या दृष्टीने पत्रकारांनी लिखाण कारण्याचे आवाहन केले. यावेळी संघटनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड, संघटक मंत्री उदय पुंडे, जिल्हा कोषाध्यक्ष गजानन गंजेवाड, युवा उपाध्यक्ष मोहन कळमकर, युवा कार्याध्यक्ष गोपाल गौरवाड, तालुका अध्यक्ष मारोती गव्हाळे, सचिव कमलाकर दुलेवाड, कोष्याध्यक्ष मैनुद्दीन सौदागर, गजानन नावडे संघटक मंत्री, सदस्य वसंता नरवाडे,आशिफ खान इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.

0 टिप्पण्या