कोठा तांडा येथे बंजारा समाजातील महिलांचा तीज महोत्सव उत्साहात साजरा. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल पतंगे यांचाही उत्सवात सहभाग.


दाऊ गाडगेवाड -हिमायतनगर प्रतिनिधी 

आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक समाज घटक वेगवेगळे उत्सव आपल्या वेगळ्या ढंगाने आणि परंपरेने साजरे करतात. त्याच प्रमाणे बंजारा समाजात तीज उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कधीकाळी डोंगरदऱ्यात राहणाऱ्या बंजारा समाजात तीच म्हणजे आनंदाची पर्वणीचं....सध्या श्रावण महीण्यात बंजारा तांड्यांवर तीज उत्सवाची धुम पहायला मिळत आहे.

            पारंपारीक वेशभूषेत फेर धरून नाचणाऱ्या ह्या महीला..... वाटत असेल एखाद्या कार्यक्रमात अथवा लग्नात त्यांनी असा फेर धरला असेल.... पण हा उत्सव आहे तीजेचा..... बंजारा समाजातील तीज !... दृश्यातील हा सण आहे. 

       हिमायतनगर तालुक्यातील कोठा  तांड्यांमध्ये राहत असलेल्या बंजारा समाजाने आपली वेगळी परंपरा, लोकसंस्कृती, वेगळेपण आजही जपले आहे. हे वेगळेपण अगदी चालीरिती, पेहराव आणि बोलीभाषा या सर्वांमध्येचं आलं.  तीज उत्सव हा बंजारा समाजाची दिवाळीच. बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचे  सर्व पदर आणि पैलू उलगडणारा उत्सव म्हणजे तीज... मुळात बंजारा समाजात तीज उत्सव दहा दिवस साजरा केला जातो. श्रावण महीण्यातील राखी पौर्णिमेपासून त्यांच्या तीज उत्सवाला सुरूवात होते. याची चाहुल आणि लगबग या दिवसांपासून बंजारा तांड्यांमध्ये होते ती बंजारा लोकगितांनी.... फक्त मौखिक असणाऱ्या या गितांमध्ये लोकगिते म्हटली जातात. 

             दहा दिवसाआधी अविवाहीत मुली एका टोपलीत " गौरी स्वरूप"  धान (गहू ) पेरतात, रोज त्याला पाणी घालून बोलीभाषेत गीते म्हटली जातात. या समाजातील लहान-मोठ्या  महीलाही पुरूषांच्या बरोबरीने म्हणा किवा त्यांच्यापेक्षा जास्त उत्सहाने उत्सवात सहभागी होतात. याकाळातील बंजारा लोकगीते  त्यांच्या संस्कृतीला समृद्ध आणि संपन्न करणारी असल्याने तीज उत्सवाच्या काळात गाण्यात येणारी लोकगीतं आणि परंपरांमध्ये महिलांच स्थान ठसठशीतपणे समोरं येतं. संत सेवालाल महाराज यांच्या विचारांवर तांड्यामध्ये सुख शांती समृद्धी लाभण्यासाठी निसर्गाला सर्वस्व माणुन बंजारा बांधव निसर्गाची पुजा करुन दरवर्षी हा सण साजरा करत असतात, याही वर्षी बंजारा बांधवांनी मोठ्या उत्साहाने हिमायतनगर तालुक्यातील कोठा तांडा येथे तीज सण ( उत्सव) साजरा करण्यात आला, या उत्सवाला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल पतंगे, , हिमायतनगर नगरपंचायतीचे भावी उमेदवार गणेश रच्चेवार, आकाश सुर्यंवंशी, पत्रकार दाऊ गाडगेवाड  यांनीही उत्सवात सहभाग घेऊन बंजारा बांधवाना उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.  तीज उत्सव साजरा करण्यासाठी कोठा तांडा  येथील उपसरपंच संतोष राठोड, विजय राठोड, लालु पवार, प्रमोद राठोड, विनोद जाधव, जगदीश जाधव, अंकित राठोड, लवकुश जाधव, आदित्य राठोड, सुरज राठोड, गजानन चव्हाण यानी परीश्रम घेतले.

तीज हा उत्सव म्हणजे बंजारा समाजाची दिवाळीचं.. बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचे सर्व पदर आणि पैलू उघडणारा उत्सव म्हणजे तीज... मुळात बंजारा समाजातील तीज उत्सव हा दहा दिवस साजरा केला जातो.. श्रावण महिन्यातील राखी पौर्णिमा पासून तीज उत्सवाला प्रारंभ होतो.. या उत्सवामध्ये सहभागी होण्याचे भाग्य मला कोठा तांडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याकर्ते अंकित राठोड यांच्या आमंत्रनाने लाभले असे तालुकाध्यक्ष सुनिल पतंगे यांनी मत व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या