महागाव प्रतिनिधी :-संजय जाधव
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता विचारात घेऊन गणेशोत्सवातील गर्दी टाळण्यासाठी यंदाही मिरवणुका व लहान-मोठे कार्यक्रम घेतले जाऊ नयेत. कोणीही कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोचविण्याचा प्रयत्न केल्यास त्याची गय केली जाणार नाही असा इशारा व आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली बिटरगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप बोस यांनी टाकळी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या इसापूर पिंपळवाडी येथील गणेशोत्सवाच्या बैठकीदरम्यान दिला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपळवाडी येथील गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभासद यांची बैठक घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते.
यावेळी पोलिस निरीक्षक प्रताप बोस म्हणाले, तिसऱ्या
लाटेची भिन्नता लक्षात घेऊन शक्यतो एक गाव एक गणपती साजरा करण्याचा प्रयत्न करावा. लोकवर्गणीतून जमा होणाऱ्या निधीतून मेडिकल कॅम्प किंवा सामाजिक उपक्रम आयोजित करावेत. गणेश मंडळाची मूर्ती तीन फूट व घरगुती मूर्ती दोन
फुटापेक्षा लहान असावी. सार्वजनिक गणेशोत्सवाची मंडळाची मूर्ती अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांच्या घरी बसवावी. सर्व मंडळांनी गणेशोत्सव हा सण अत्यंत साध्या पद्धतीने साजरा
करावा. गावातील नागरिकांनी
गणेशोत्सव सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आश्वासन बैठकी दरम्यान दिले. यावेळी , निगंनुर बिटचे जमादार गजानन खरात , पोलीस शिपाई दत्ता कुसराम प्रफुल चव्हाण
इसापूर येथील पोलीस पाटील संध्या मारकवार ,सरपंच उज्वला हाके, उपसरपंच दिलीप जाधव,
ग्रामपंचायत सदस्य संदेश मोरे, विठ्ठल गव्हाळे, उमेश जाधव, गोविंद राठोड, राम राठोड ,मोहन जाधव ,विनोद जाधव,गजानन चव्हाण , भारत जाधव ,अविनाश चव्हाण, अविनाश जाधव ,प्रदीप राठोड इंजिनिअर, ह .भ .प .दत्ता महाराज ,विनोद चव्हाण, पत्रकार संजय जाधव, मैनोदीन सौदागर व गावातील प्रतिष्ठित नागरिक या बैठकीला उपस्थित होते.

0 टिप्पण्या