त्या घटनेचा शोध लागला. मृत अभ्रक ढाणकीतलेच. एकाला अटक.



ढाणकी प्रतिनिधी -

काल ढाणकी येथील टेम्भेश्वर नगर मध्ये मृत अभ्रक सापडल्याने ढाणकी परिसरात एकच खळबळ उडाली होती.  तेव्हा पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि त्या मृत अभ्रकाचा नातेवाईकांचा शोध लागला.  

सदर मृत बाळ हे ढाणकी येथीलच असून ते प्रसूती दरम्यान मृत पावल्याने सदर बाळाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याच्या आई वडिलांनी  गावातीलच एका व्यक्ती ला दिले होते.  मात्र त्या व्यक्तीने अंतिम संस्कार न करता उघड्यावर फेकून दिले होते.  ते काल गुराख्याच्या निर्दर्शनात आल्यावर सदर प्रकार उघडीस आला.  या प्रकरणी त्या बेजबाबदार व्यक्तीला ताब्यात घेतले असून अधिक तपास बिटरगाव पोलीस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या