दाऊ गाडगेवाड हिमायतनगर
हिमायतनगर शहरातील बस्थानकात शनिवार दि. ११ रोजी दुपारी अंदाजे ठिक १२. ४५ वाजता सुमारे इयत्ता १२ मध्ये शिकत असलेल्या युवकाचा धारदार शस्त्राने छातीत वार करून हत्या करण्यात आली.
सविस्तर माहिती नुसार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष उत्तम मिराशे यांचा मुलगा यश हा हिमायतनगर येथील हुतात्मा जयवंतराव पाटिल महाविद्यालयात इयत्ता १२ वीमध्ये शिक्षण घेत होता सध्या कोरोणा विषाणुचे देशावर सावट असल्याने शाळा महाविद्यालये बंद असून प्रगती गंगाई कोचिंग क्लासेसमध्ये यशची शिकवणी चालू होती. तो रोजनिशी नुसार सकाळी शिकवणीसाठी क्लासेसला आला होता.
नेहमीच वर्दळीचे ठिकाण असलेले परमेश्वर मंदीर बसस्थानकात झालेल्या वादातुन अनुज पवनेकर याने सलिम शे. जब्बार, करणसिंह ठाकूर या मित्रांच्या मदतीने मयत यश उत्तम मिराशे वय वर्ष १७ छातीत धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली तर सोडवायला आलेला सोहम चायाल हा जखमी झाला. सदरील घटनेतील आरोपींवर रात्री ८ वाजेपर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता. मयताच्या नातेवाईकांनी आक्रमक भुमीका घेतल्याने आरोपींवर गुन्हा नोंद वही क्र. २१३/ २०२१ कलम ३०२,३०७, भादवी ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला यात तीन आरोपींना अटक करण्यात आली.
घटना घडल्यानंतर पोलिस अर्धा तास उशिरा आल्याने हिमायतनगर शहरात तीव्र पडसाद उमटलेले पहायला मिळाले. हिमायतनगर तालुक्यात पोलिसांच्या ढिसाळ कामाने अवैद्य धंद्यांचे थैमान घातले आहे. यांचा तालुक्यात कोणावरही अंकुश राहीला नाही. वारंगटाकळी येथे एका युकावर प्राणघातक हल्ला होऊन आठवडाही झाला नाही कि, हिमायतनगर शहरात दुसरे प्रकरण घडल्याने तालुका गँग वाँरच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत आहे . अशा या घटनेमुळे ग्रामिण भागातुन शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थीनींच्या पालकांतुन चिंता व्यक्त केली जात असुन भितीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसवल्याचे नागरीक भावना व्यक्त करत आहेत.
खुनाची घटना घडल्या नंतर अप्पर पोलिस अधिक्षक कबाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी गोपाळ राजनकर यांनी घटनास्थळाला भेट देवुन परस्थितीचा आढावा घेतला प्रकरण गंभीर असल्याने शहरात तळ ठोकुन होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक भगवान कांबळे यांचे पथक करत आहे.

0 टिप्पण्या