दाऊ गाडगेवाड -हिमायतनगर प्रतिनिधी
श्रावण महिन्यात पावसाने कहर केला असून सोमवारी रात्री पासून तालुक्यात मुसळधार पावसाने जोर धरल्याने नदी नाले तुडुंब भरली असुन पैनगंगा नदी दूथडी भरून वाहत असल्याने गांजेगाव पूल पाण्याखाली गेला असुन विदर्भ मार्ग बंद झाला आहे तर महामार्गावरील खैरगाव येथील हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापसाची पिके पुर्णपणे पाण्याखाली गेली असल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याने या नैसर्गिक आपत्ती ला शेतकरी वैतागला आहे. सध्या पावसाचा जोर वाढत असून पैनगंगा नदी काठच्या शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. तर नाले,ओढे तुडूंब भरून वाहुन बांध फुटून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून पिके आडवी होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.दि.7 सप्टेंबर रोजी मंगळवारी दिवसभर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरुच होता.पैनगंगा नदी दुथडी वाहु लागल्याने विदर्भातील गांजेगाव पुलावरून पाणी वाहु लागल्याने विदर्भातील ढाणकी जाणारा मार्ग बंद झाला आहे.तर महामार्गावरील खैरगाव येथील अर्धवट पुल देखील पाण्याखाली गेल्यामुळें या मार्गावरची वाहतूक बंद झाली आहे. हदगाव मार्गावरील जवळगाव जवळील पुलावर पाणी असल्याने दुपारी मार्ग बंद असल्याने वाहतूक बंद आहे.मंगळवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तालुक्यात मुसळधार पाऊस सुरुच असल्याने अनेक गावच्या नाल्यांना पुर आला होता. तर शहरातील नाल्यांचे पाणी रस्त्यावर वाहू लागले होते.
वडगाव (ज) पुलावरून अँटो वाहुन गेला तर चालक बांलबांल बचावला....
राज्य महामार्गावर असलेल्या वडगाव (ज) गावालगत मोठा नाला असुन या नाल्याला दरवर्षी अचानक पुर येतो गत वर्षीच एक शेतकरी वाहुन गेल्याची घटना घडली होती. सोमवारी सायंकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान अटो चालक शिवाजी भुरके हे गावाकडे निघाले असता नाल्याला अचानक पुर आला या पुलावरून अटो काढताना पुर वाढत गेला त्यामुळे अटो पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असल्याने अटो चालकाने आरडाओरडा करताच काही युवकांनी त्या अँटो चालकाला पुरातुन बाहेर काढले परंतु अटो वाहुन गेला आहे.
अटो चालक बांलबांल बचावला असला तरी नैसर्गिक आपत्ती मुळे अँटोवर जिवनाचा गाडा चालणाऱ्या चालकावर मात्र उपास मारीची वेळ आली आहे. दिवसभर अँटोचा शोध घेतला परंतु अँटो सापडला नाही अशी माहिती आहे. सदरील पुलाची उंची वाढवून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पैनगंगा नदी काठासह तालुक्यातील शेतकऱ्यांनी सतर्क रहावे आ. जवळगावकर
मुसळधार पावसाने ईसापुर धरण तुडुंब भरले असल्यामुळे पैनगंगा नदी काठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहून स्वतची काळजी घ्यावी तसेच हदगाव-हिमायतनगर या तालुक्यात मुसळधार पावसाने नाले, ओढे तुडूंब भरून वाहु लागले असुन शेतकऱ्यांनी स्वतची काळजी घ्यावी तसेच या पावसात सतर्क राहून नैसर्गिक आपत्ती मुळे कुठे काही घटना घडल्यास तात्काळ प्रशासनास कळविण्याचे आवाहन आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले आहे.

0 टिप्पण्या