मोहन कळमकर ढाणकी
मो 7385861446
ढाणकी आणि समस्या याचा पाढा कितीही वेळा वाचा तो संपणारा नाही. अनेकवीध समस्येने ढाणकी ला ग्रासले असून त्यामध्ये आरोग्य, शिक्षण स्वछता या गोष्टीचा मोठा अभाव शहरात आज दिसत आहे. स्वच्छतेचा विषय घेतल्यास
भविष्यात तालुका होण्याचे स्वप्न बघणाऱ्या ढाणकी शहराला अद्याप एकही सार्वजनिक स्वछता गृह नगरपंचायत ने उभे केले नसल्याने नागरिकांमध्ये संताप दिसून येत. पुढील काही दिवसात ढाणकी तालुका होईलही पण अजून मूलभूत सुविधा जर नागरिकांना मिळत नसतील तर तालुका होण्याचे स्वप्न पाहण्यात अर्थ नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अंदाजे 30 ते 35 हजार ढाणकी शहराची लोकसंख्या आहे त्याच बरोबर 35 ते 40 खेडे हे ढाणकी ला जोडले असल्याने शहरातील बाजारपेठेत नागरिकांचा मोठा राबता असतो. विविध कामासाठी ढाणकीला येतात. मात्र शहरात स्वछता गृहच नसल्याने कोठे तरी त्यांना आडोसा शोधावा लागत आहे. पुरुष आडोसा शोधतीलही मात्र महिलांचे काय? या मुळे महिलांची मोठी कुचंबणा होत असून नगरपंचायत या कडे दुर्लक्ष करत असल्याचे सध्या चित्र आहे.
शहरात आज विविध लोक हिताच्या मागण्यासाठी राजकीय पक्षांना आंदोलन करावे लागत आहे. आता सार्वजनिक स्वछता गृहासाठी आंदोलन करावे लागेल का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. राजकीय नेते तसेच नगरसेवकांनी तरी या मागणीला नगर पंचायत सभागृहात मांडण्याची आणि त्याचा पाठपुरावा करण्याची मागणी होतअसून
नागरिकांसोबतच बाजार पेठेतील व्यापाऱ्यांना ही स्वछता गृहा अभावी त्रास होत असून लवकरात लवकर नगर पंचायत प्रशासनाने या कडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

0 टिप्पण्या