घरकुल मिळण्याचे गरीब गरजुचे स्वप्न भंगले घरकुलाची ४५ वर्षापासून वाटच पाहण्याचे दिवा स्वप्न


 लोकमानस तालुका प्रतिनिधी:-मारोतराव गव्हाळे उमरखेड

उमरखेड तालुक्यामध्ये व त्यामधील निंगनुर या पंधरा हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये घरकुल मिळण्यासाठी रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, राजीव गांधी आवास योजना, त्या पलीकडे पंतप्रधान आवास योजना अश्या शासनाच्या विवीध जनकल्याणकारी योजना कार्यान्वित असताना देखील, त्या आवास योजनेचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या गरीब आणि गरजू लोकापर्यंत पोहचू शकत नाही. कुठेतरी मधीच माशी शिंकावी अशी अवस्था निर्माण होत असताना दिसत आहे. शासनाच्या जनकल्याणकारी योजनेचा काय तर गरिब गरजूना डावलून श्रीमंताच्या महालमाड्या उभ्या राहिल्याचे विदारक चित्र मात्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे घरकुलाच्या लाभापासून अनेक गरीब व गरजू जनता वंचित असल्याचे चित्र दिसून येते आहे. एकीकडे घरकुल मिळत नाही. दुसरीकडे घरकुलाचा हफ्ता मिळण्यासाठी साशकिय कार्यालयाकडे हेलपाट्या मारून कसरत करावी लागते. तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेची घरकुलाबाबत  मोठी समस्या निर्माण असताना, आजही गरीब जनता घरकुल लाभापासून वंचित राहण्याची वेळ निर्माण झाली आहे.

अन्न वस्त्र निवारा माणसाच्या मूलभूत गरजा असताना, निवाऱ्याविना जीवन व्यतीत करण्याची वेळ निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाच्या जनकल्याणकारी योजनेचा फायदा काय? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. उमरखेड तालुक्यातील निंगनुर हे गाव फार मोठे असून, येथील लोकसंख्या ही पंधरा हजार आहे. यामध्ये २०२१ मध्ये सर्वांना हक्काचे घर मिळावे म्हणुन सर्व समावेशक शबरी आवास योजना, रमाई आवास योजना, राजीव गांधी आवास योजना, पंतप्रधान आवास योजना या विवीध योजना ग्राम पंचायत लेवलवर राबविली जाते. येथील गरीब जनता घरकुलाच्या अपेक्षेत आहेत. येथील लोकांना निवाऱ्याची व्यवस्था होईल या आशेवर बऱ्याच लोकांनी कागदपत्राची जुळवाजुळव करून, पैसे खर्च करुन फाईलही बऱ्याच लोकांनी दाखल केल्या. परंतु ग्राम पंचायत निर्माण होउन जवळपास ४० ते ४५ वर्ष कालावधी होऊनही सर्वसमावेशक विवीध पंतप्रधान आवास योजने सारखा लाभ गरीब गरजूना मिळू शकला नाही. त्यामध्यें बऱ्याच फाईल धूळखात पडल्या आहेत, शासनाकडे निधी उपलब्ध नाही, उचस्तरावरून सांगितल्या जाते. येथील गरीब गरजूचे स्वप्नच भंगले असून, कधी घरकुल मिळतील वाटच पहावी लागतं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या