चोरी प्रकरणातील आरोपीना एक दिवसाची पोलीस कोठडी तालुक्यात होत असलेले चोरी प्रकरणे उघड होण्याची शक्यता.

 


दाऊ गाडगेवाड -हिमायतनगर प्रतिनिधी 

हिमायतनगर शहरातील मागील २ महिन्यापूर्वी चोरीला गेलेल्या १३  लाख रूपयाची चोरी झाली होती , त्या चोरीतील मुख्य आरोपीसह ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून २.५ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या चोरीतील आणखी तीन जण फरार असून, लवकरच्या त्यांना बेड्या घालू अशी माहिती पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. दम्यान या पाचही जणांना आज दिवाणी न्यालयात हजार केले असता न्यायधिशानी १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून, यावेळी चोरट्याला पाहण्यासाठी न्यायालय परिसरात मोठी गर्दी जमली होती. त्यांच्याकडून होणाऱ्या तपासातून मागील काळात शहरात झालेल्या चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शहरातील हिमायतनगर - किनवट मार्गावर शंकर ट्रेडिंग कंपनी नावाने असलेल्या अविनाश संगणवार यांच भुसार दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी दि.०९ जून रोजी काउंटरच्या लॉकरमध्ये असलेली १३ लाख ७० हजारांची रक्कम दुकानचे शटर वाकवुन चक्क काउंटर उचलुन नेऊन रक्कम हाती लागताच चोरटे पसार  झाले होते. ही बाब लक्षात येताच पोलिसांनी दुकानातील व दुकाना बाहेरील सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यावर कैमेऱ्यामध्ये काही चोरटे  कैद झाले. चोरीच्या प्रकारामुळे हतबल झालेल्या व्यापा-यांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यासह, भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक व पोलीस उपमहानिरीक्षक यांची भेट घेतली. दरम्यान आमदार माधवराव पाटील जवळगावकर, बाबूराव कदम कोहळीकर आणि खासदार हेमंत पाटील यांनी भेट देऊन या चोरीचा तपास का..लागत नाही ? अशी विचारणा संबंधित पोलिसांना केली होती.

दरम्यान पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने कबुली दिली आणि यात अनेकजण सामील असल्याचे सांगितले होते. त्या दिशेने तपासाची चक्रे फिरविली असता चोरी करून दोन महिन्यांपासून फरार असलेल्या टोळीच्या म्होरक्याला किनवट शहरापासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोठारी येथील पेट्रोल पंपाजवळ दि.०३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ०५ वाजता मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पोलीस उपमहासंचालक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी भोकर श्री राजनकर याना देऊन पोलीस निरीक्षक भगवान कांबळे उपनिरीक्षक परशुराम देवकते, पोहेकाँ अशोक सिंगणवाड, पोहेकॉ हेमंत चोले, पोकाँ. लायक आणि चालक यांच्या टीमने चोरट्याची चौकशी करून यात बाबुलाल आनंदराव जाटवे, परमेश्वर दिगंबर बनसोडे, सय्यद एजाज सय्यद फय्याज, शेख मलिक शेख मौलाना, अन्य एक अश्या ५ जणांना पोलिसांनी अटक केली असून, ३ जन फरार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्याकडून २.५ लाख रुपयाची रक्कम जप्त केली आहे. त्या पाचही जणांना आज न्यालयासमोर हजर केले असता न्यायाधीश यांनी १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अन्य आरोपीना अटक करण्याचे काम पोलिसाना करावे लागणार असून, या टोळीने आत्तापर्यंत कुठे कुठे चोऱ्या केल्या, हिमायतनगर शहरासह तालुक्यात होणाऱ्या  मागील काळात झालेल्या चोरीच्या घटनात यांचा समावेश आहे का..? या दिशेने पोलिसाना तपास करावा लागणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या