दाऊ गाडगेवाड- हिमायतनगर प्रतिनिधी
पत्रकार सुध्दोधन हनवते यांची मराठवाडा प्रदेश मजुर पक्षाच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे, या निवडीचे पत्र राष्ट्रीय सचिव अनिल चव्हाण यांनी दिले आहे.
मजूर पक्षा कडून हनवते यांना देण्यात आलेल्या निवडीच्या पत्रात म्हटले आहे, तुमचे मानवतावादी सामाजिक कार्य आणि पक्षासाठी केलेले कठोर परिश्रम लक्षात घेऊन, पक्षाच्या समितीच्या निर्णयानुसार तुम्हाला तीन वर्षांसाठी मराठवाडा प्रदेश महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष म्हणून नियुक्त केले जाते. आम्हाला विश्वास आहे की आपण ज्या जिल्ह्यात नियुक्त केले आहेत त्या जिल्ह्यातील खरे, प्रामाणिक, मेहनती, धार्मिक लोकांना जोडून तुम्ही या पक्षाचा हेतू वाढवण्याचा प्रयत्न कराल.
या पक्षाला ठाम विश्वास आहे की तुमच्या मेहनतीमुळे तुम्ही देशातील गरजू, गरीब, वंचित पीडितांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी पक्षाचे नाव उंच उंचीवर नेऊ शकाल.
यापुर्वी शुध्दोधन हनवते यांनी, भारीप प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन हिमायतनगर तालुका अध्यक्ष, संविधान पार्टि हिमायतनगर तालुका अध्यक्ष, पदी काम करून सामाजीक कार्य वाढवले होते.
हनवते यांची दलित मतदारांवर चांगली पकड असु
आगामी जिल्हापरीषद पंचायत समित्यांच्या तोंडावर हि निवड महत्त्वपुर्ण मानली जात आहे. पक्षाने केलेल्या निवडीमुळे राजकिय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.
त्यांच्या निवडीचे जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, जेष्ठ पत्रकार प्रकाश जैन, संवाददाता अनिल मादसवार, असद मौलाना, पत्रकार संघाचे अध्यक्ष गोविंद गोडसेलवार, ग्रा.प. स. सोपान बोंपिलवार, संजय मुनेश्वर , दिलीप शिंदे, सुनिल चव्हाण, अनिल नाईक, विष्णु जाधव, दाऊ गाडगेवाड, धम्मपाल मुनेश्वर, संजय सुर्यवंशी, पांडुरंग गाडगे, पाशा खतीब, कानबा पोपलवार, राम गुंडेकर, राजु गायकवाड, दत्ता शिराणे, आदिंनी अभिनंदन केले आहे.


0 टिप्पण्या