उमरखेड प्रतिनिधी
उमरखेड तालुक्यातील शाळांमध्ये प्रतिनियुक्ती देण्यात आलेले शिक्षक नोकरीच्या ठिकाणी हजर न राहता आपल्या मुख्यालयाला दांडी मारत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने प्रतिनियुक्ती देण्यात आलेले शिक्षक जर नियुक्ती करण्यात आलेल्या ठिकाणी उपस्थित झाले नाही तर मनसे स्टाईल ने आंदोलन करण्याचा ईशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उमरखेड तालुक्याचा दौरा केला असता त्यांना शिक्षण विभागाने बऱ्याच प्राथमिक , उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या ग्रामस्थांच्या कोणत्याही तक्रारी नसतांना त्या शाळेतील शिक्षकांच्या प्रतिनियुक्ती पद रिक्त ठेवून चिरीमिरी घेवून त्या शिक्षकांच्या प्रतिनियुक्ती करण्यात आल्या . असे निदर्शनास आले.संबंधीत गावाच्या शिक्षण समितीने पाठ पुरावा करून सुध्दा पदे भरण्यात आलेली नसुन.ज्या शिक्षकांची ज्या शाळेवर पदस्थापना झाली त्याच शाळेवर त्याच मुख्यालयी राहणे गरजेचे असतांना शिक्षण विभाग प्रशासन हित संबंध जोपासत शासनाच्या आदेशाची ऐशी तैशी करत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने हा गंभीर विषय घेवुन मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, मनविसे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे यांनी शिक्षणाधिकाऱ्याला जाब विचारत चांगलेच धारेवर धरून प्रतिनियूक्तीवर दिलेले शिक्षक हे १५ दिवसाच्या आत परत त्या त्या शाळेवर देण्यात यावे किंवा पर्यायी व्यवस्था करावी जेणे करून शैक्षणीक कार्य खंडीत होणार नाही.जर वरील विहित मुदतीत प्रतिनुयुक्त रद्द न केल्यास मुदतीनंतर शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा ईशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला.यावेळी मनसेच्या वतीने निवेदन देतांना मनसे जिल्हाउपाध्यक्ष डेविड शहाणे,तालुकाध्यक्ष सादिक शेख,शहर अध्यक्ष संजय बिजोरे,हीरासिंह चव्हाण,मुकुंद जोशी,सिद्धार्थ घुगरे,सैय्यद तोसीफ,प्रवीण भीमटे,मुन्ना रहेमान,गुड्डू शंकर जाधव यांच्यासह मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
प्रतिनियुक्ती दिलेले शिक्षकांचे गट शिक्षणाधिकारी यांचेशी अर्थपुर्ण संबंध असल्याने हे शिक्षक कर्तव्याच्या ठिकाणांवर दांडी मारत आहेत. येत्या १५दिवसात हे शिक्षक प्रतिनियुक्ती दिलेल्या ठिकाणी हजर झाले नाहीतर विद्यार्थ्यांसह मनसेच्यावतीने गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल.
:- सादिक शेख(मनसे तालुकाध्यक्ष उमरखेड)

0 टिप्पण्या