हिमायतनगर तालुक्यातील मौजे कारला पी. येथील यश उत्तम मिराशे या विद्यार्थ्याचा भर दिवसा वर्दळीचं ठिकाण असलेल्या बसस्थानकात निर्घुण हत्या केली. या घटनेतील केवळ तीन आरोपींनाच अटक कली. परंतु यशच्या हत्या प्रकरणात केवळ तीनच आरोपी नसुन येथील पोलिस प्रशासन बाहेर असलेल्या आरोपींना पाठीशी घालण्याच काम करत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. हत्या प्रकरणातील समाविष्ट असलेले आणि सिसिटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेल्या सर्व मुलांना अटक करून त्यांची सखोल चौकशी करून सह आरोपी म्हणुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. पंधरा दिवस अगोदर फोनवर संभाषण झालेली रेकाँर्डींग तपासावी कारण त्यातुन एकमेकांशी काय संभाषण झालं त्याची माहीती मिळेल. बसस्थानकात पोलिस चौकी स्थापन करावी. चिडीमार पथक स्थापन करावे, शाळेत शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना संरक्षण देण्याची पोलिस प्रशासनाने लेखी स्वरूपात हमी द्यावी , हत्येच्या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी व यश उत्तम मिराशेला न्याय मिळावा यासाठी हिमायतनगर शहरात ग्रामिण भागातील कारला पि. सह इतर खेड्यातील नागरीकांनी भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शहरातीलही नागरीकांनी सहभाग नोंदवला.
हिमायतनगर शहरात ग्रामिण भागातील मुल, मुली मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षण घेण्यासाठी येतात. परंतु शहरातील टुकार मुलांचे टोळके तयार झाल्याने ग्रामिण भागातुन येणारे मुलं, मुली सुरक्षीत राहीले नाहीत. त्यांच्यावर भर दिवसा हल्ला करून एका निष्पाप मुलाचा बळी घेतात. यातुन असे निष्पन्न होते, येथील पोलिस प्रशासनाचे टुकार मुलांवर म्हणजेच गुंडावर अंकुश राहीला नाही. ज्या वयात पाठीवर पुस्तकांच ओझ असायला पाहीजे त्या वयात मुलं हत्यार घेऊन फिरत असतील तर मुलांना आपण काय संस्कार देत आहोत याकडेही आपणाला लक्ष द्यावे लागेल. जो पर्यंत हिमायतनगर शहरातील गुंड प्रवृतीच्या लोकांवर अंकुश लावणार नाही तो पर्यंत अशा घटना तालुक्यात घडतच राहतील. याला पुर्णपणे येथील पोलिस अधिकारी हेच जबाबदार आहेत. या घटनेमुळे ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण अंधारमय बनत चालले असल्याचे उद्गार सुनिल पतंगे यांनी काढले.
यश हत्या प्रकरणातील काही आरोपींना पोलिस प्रशासनाने मोकाट सोडले आहे, मुख्य आरोपी पोलिस व मयत यशच्या नातेवाईकांना सांगत आहे. मी दोषी आहे पण या कटातील मुख्य आरोपींना पोलिस का पकडत नाही. मी जेवढा दोषी आहे तेव्हढेच बाहेर सोडलेले सुद्धा दोषी आहेत. याचा अर्थ असा होतो की, पोलिस प्रशासनावर कोणाचा तरी दबाव आहे असा संशय मयत यशच्या नातेवाईकांसह कारला पी. येथील नागरीक बोलत आहेत. कारण हत्या १२.४५ वाजता होते, तक्रार मयताच्या वडीलांची न घेता दुसरेच कोणाची तरी घेण्याचा प्रयत्न करतात आणि गुन्ह्याची नोंद करायला रात्रीचे ९ वाजवतात त्यामुळे संशयाचे वातावरण आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना पकडून त्यांना शिक्षा नाही झाली तर वखराचे रूमणे घेऊन रस्त्यावर उतरू आणि प्रशासनाला धडा शिकवू. जो पर्यंत सर्व आरोपींना पकडून फाशीची शिक्षा होणार नाही तो पर्यंत हा लढा असाच चालू राहील असे वक्तव्य माधव देवसरकर यांनी काढले. तसेच शाहीर राम वानखेडे, शिवाजी जाधव हरडफकर, किसनराव वानखेडे, कारला येथील डाँ, गफार साहेब, गणेश शिंदे, राम सुर्यवंशी, विठ्ठल ठाकरे, विजय वळसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर मोर्चाचे सुत्रसंचालन नागेश कोथळकर यांनी केले.
परमेश्वर मंदीरापासून मोर्चाला सुरूवात झाल्यानंतर पोलिस स्थानकात उपविभागीय पोलिस अधिकारी गोपाळ राजनकर यांना निवेदन दिल्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी पोलिस प्रशासनाने ८ दिवसाचा वेळ मागीतला आहे. त्यानंतर परमेश्वर मंदीर येथे तहसिलदार यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता करण्यात आली. शहरासह तालुक्यातील ग्रामिण भागातील शेतकरी, नागरीकांनी हजारोच्या संख्येने मोर्चात सहभाग घेतला.


0 टिप्पण्या