दाऊ गाडगेवाड- हिमायतनगर प्रतिनिधी
हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील तंटामुक्ती समिती अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्याने सरपंच मारोती वाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली नविन तंटामुक्ती समिती अध्यक्षपदाची प्रत्यक्ष मतदानाने निवडणुक प्रक्रिया पार पडली असता वसंत चांदराव वानखेडे यांचीच अध्यक्षपदी वर्णी लागली .
तंटामुक्ती अध्यक्षपदासाठी गावातील चार व्यक्ती इच्छुक असल्याने लोकशाही मार्गाने निवडणुक घ्यावी लागली असता एकुन १५९ व्यक्तींनी मतदानाचा हक्क बजावला यात वसंत वानखेडे यांना ७५ मते, विनायकराव सुर्यवंशी ५२ मते, अनंत कदम २६ मते, मधुकर गायकवाड यांना ५ मते मिळाली तर १ मत बाद झाले. वसंत वानखेडे यांंना सर्वाधिक मते मिळाल्याने त्यांचा विजय झाला. वसंत वानखेडे यांनी मागील त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात समाधानकारक काम केल्याने त्यांच्या कार्याचे हे मिळालेले बक्षीस आहे. यावेळी निवडणुक निर्वाचिन अधिकारी ग्रामसेवक साईनाथ कासटवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनिल पतंगे, उपसरपंच गजानन देवसरकर, माजी सभापती वामनराव वानखेडे, पोलिस पाटिल शंकरराव वानखेडे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष दिगांबर वानखेडे, माजी सरपंच किसनराव वानखेडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या