सर्व आरोपींना शिक्षा करून यशला लवकर न्याय मिळावा यासाठी निषेध मोर्चा, विद्यार्थी, विद्यार्थीनी पालक भयभीत झाल्याने सुरक्षा पुरवण्याची केली मागणी.



दाऊ गाडगेवाड -हिमायतनगर प्रतिनिधी 

हिमायतनगर शहरातील बसस्थानकात भर दिवसा वर्दळीच्या ठिकाणी यश मिराशे या विद्यार्थ्याचा वर्ग मित्रानेच चाकू भोसकुन खुन केला. या घटनेने हिमायतनगर तालुका हादरून गेला. ग्रामीण भागातुन विद्यार्थी, विद्यार्थीनी व पालक वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

              ग्रामीण भागातील विद्यार्थी, विद्यार्थीनी शिक्षण घेण्यासाठी हिमायतनगर शहरात येतात. पण शहरात कुठलाही पोलिस बंदोबस्त नाही, शाळा, महाविद्यालय बसस्थानकाच्या ठिकाणी पोलिस चौकी नाही, त्यात पोलिस प्रशासनाचे ढिसाळ काम. या बाबी लक्षात घेऊन  शहरातील वर्ग मित्रांनी मिळून ग्रामीण भागातील यश मिराशे या विद्यार्थ्याला एकटे गाठून भर दिवसा त्याचा  खुन करण्यात आला.  चित्तथरारक खुणाच्या घटनेने विद्यार्थीनी, विद्यार्थ्यांना आता सुरक्षा पुरवणे काळाची गरज बनली आहे. ठिकठिकाणी सीसीटिव्ही कँमेरे बसवणे, पोलिस चौकी बसवणे, चिटीमार पथक स्थापन करून सर्वांवर लक्ष ठेवावे लागणार आहे. 

            आतातरी पोलिस प्रशासनाने अवैद्य धंदे वाल्यांचेच गुणगाण न गाता सगळीकडे लक्ष देऊन दक्षता पाळावी. वर्दळीच्या ठिकाणी पोलिस चौकी, चिटीमार पथक असते तर कदाचित यश मिराशेचे प्राण गेले नसते. पण शहरात  कार्यक्रम किंवा एखादा राजकिय मोठा नेता आला तरच पोलिस बंदोबस्त दिसतो. 

             यापुढे शहरासह तालुक्यात अशी घटना घडू नये आणि यश मिराशेच्या सर्व मारेकऱ्यांना  विलंब न  करता कठोर शिक्षा करण्यात यावी, या प्रकरणातील जे कोणी फरार आरोपी आहेत त्यांनाही गजाआड करून त्यांनाही शिक्षा करण्यात यावी व यशला लवकर न्याय मिळवून द्यावा यासाठी येत्या गुरूवारी दि. १६ सप्टेंबर रोजी पुर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे यासाठी व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे. या निषेध आंदोलनात ग्रामीण भागातील पालक वर्गासह नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे कारला पी. येथील मयत यश मिराशेच्या परीवाराने आवाहण केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या