दाऊ गाडगेवाड -हिमायतनगर प्रतिनिधी
गऊळ ता. कंधार जि. नांदेड येथे पोलिस प्रशासनाच्या सहाय्याने दडपशाही करत कंधार तालुका प्रशासनाने लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा हटवला आणि मातंग समाजाच्या माता भगिनी, बांधवांवर अमानुष लाठीचार्ज करुन त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. या घटनेचा हिमायतनगर तालुक्यातील विविध सामाजिक संगटना, राजकीय पक्ष यांच्या वतीने तहसील कार्यालय हिमायतनगर येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा सन्मानाने पुनर्स्थापित करण्यात यावा, समाज बांधवांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे, या प्रकरणाचे मुख्य सुत्रधार समोर येण्यासाठी या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करून दोशींवर कठोर कार्यवाही करावी या मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री यांना मा. तहसीलदार महोदयांच्या मार्फत देण्यात आले.
यावेळी युवा नेते तथा मंगरूळचे ग्रामपंचायत सदस्य संतोषराव आंबेकर साहेब, लहुजी शक्ती सेनेचे राजू गायकवाड, संतोष हातवेगळे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष डॉ. रविराज दुधकावडे, जिल्हाउपाध्यक्ष गोविंदराव गोखले, दत्ता शिराणे, संतोष बनसोडे, गंगाधर गायकवाड, अंकुश अंबेकर, अंकूश कांबळे, बालाजी शिराणे, तानाजी गाडेकर, विकास गाडेकर, वनीता रामजी चितरवाड, दयानंद वाघमारे, दिपक गोरेकर, गजानन जांभळकर, गणपत गाडेकर, प्रदीप गोरेकर, मारोती गाडेकर, राजू गुंडेकर, प्रशांत तपासकर, रविकांत आंदेगावकर,गजानन बनसोडे आदींसह अनेकांची उपस्थिती होती.


0 टिप्पण्या