अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करा- भागवत देवसरकर


दाऊ गाडगेवाड- हिमायतनगर प्रतिनिधी 


नांदेड जिल्ह्यात सलग दोन दिवस मुसळधार पावसाने कहर केल्याने अनेक नाले, ओढे ओसंडून भरून वाहत आहेत. तसेच नद्याही दुथडी भरून वाहत आहेत त्यामुळे प्रशासनाने जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे. पावसाने ग्रामीण भागात घराच्या विविध ठिकाणी भिंती कोसळून पडल्याच्या घटनाही घडल्या. नांदेड जिल्ह्यात रस्त्यांचे, पुलांचे कामे चालू असल्याने पर्यायी पुलावरून पाणी वाहत असून ग्रामीण भागाकडे जाणारे रस्त्यांबरोबर किनवट- हिमायतनगर महामार्गाबरोबर हिमायतनगर- हदगाव  मार्गही बंद पडलला होता.

मागील दोन दिवसात अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यात जिकडे नजर जाईल तिकडे पाणीच पाणी दिसत आहे. ग्रामीण भागातील गावे, शेतांमध्ये पाणी शिरून जे नुकसान झालं ते खूप चिंताजनक आहे. सर्वच गावांमध्ये ओढे-नाले भरून गेले.  सोयाबीन, कापूस, तुर, ऊस, मुग, उडीद पिकांची अवस्था दयनीय बनली आहे. निसर्गाने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते केल्याने  संकटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक  मदतीची आवश्यकता असून अतिवृष्टी, पूरपरिस्थितीबद्दल प्रशासकीय अधिकाऱ्यांना संपर्क करून ग्रामीण भागातील भीषण परिस्थितीची माहिती देऊन तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची विनंती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांकडे निवेदनाद्वारे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव  विखे पाटील कृषी परिषद महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या