निंगनूर प्रतिनिधी:-गजानन नावडे
कोरोनाच्या पार्श्भूमीवर लावण्यात आलेल्या संचारबंदी मध्ये नागरिक ऑनलाईन झाल्याचे चित्र दिसून येत आहे. घरबसल्या, औषधी ,बँकाचे व्यवहार, गॅस बुकिंग,हे सर्व व्यवहार ऑनलाईन माध्यमातून केले जात असल्याने, कोरोनाने नागरिकांना ऑनलाईन व्यवहार करण्यास भाग पाडले. असल्याचे चित्र दिसून येत आहेत.
आधुनिक युगातही प्रत्यक्ष बाजारात जाऊन खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल असतो. परंतु तरुण पिढीकडून ऑनलाईन पद्धतीने सर्व काही ऑनलाईन घरी मागविण्याची प्रमाण वाढले आहे.
सद्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन घोषित केला आहे.त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे खूपच कठीण झाले आहे. त्यामुळे या संचारबंदी च्या काळात घरबसल्या बँकिगचे सर्व व्यवहार, गॅस बुकिंग, साहित्य पुरवठा सेवा, औषधी आदी वस्तू मागविण्यासाठी मोबाईल व संगणकीय माध्यमातून ऑनलाईन प्रकिया अवलंबिण्यात येत आहे. त्याचबरोबर कार्यालयीन कामे घरी बसून करण्याची पद्धती संचारबंदीत सुरू झाली आहे. त्यामुळे शासकीय व निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांचीही कामे सध्या घरी बसूनच ऑनलाईन पद्धतीने केली जात आहे. त्याकरिता इंटरनेटचा वापर भरपूर प्रमाणात वाढला आहे. मेल, व्हॉटसअप,व अन्य सॉफ्टवेअर, अॉप्लिकेशनचा वापर हा ऑनलाइन खरेदीसाठी सुरू झालेला आहे. काही खाजगी क्लासेस व शाळांकडून या संचारबंदी च्या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने धडे दिले जात आहेत. ऑनलाईन पद्धतीचा वापर करून व्हिडिओ कॉलिंगद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकविण्याचा मार्ग शोधला आहे. पूर्वी या ऑनलाईन व्यवहाराबाबात जास्त उत्सुक नसलेले नागरिक आता ऑनलाइनचाच वापर स्विकारत आहे. सततच्या वापरामुळे ऑनलाईन व्यवहाराबदल नागरिकांचे ज्ञानही पूर्वीपेक्षा जास्तच वाढले आहे. विषेच म्हणजे घरबसल्या जुन्या पिढीतील नागरिकानाही या व्यवहाराची माहिती करून दिली जात आहे. परिणामी ऑनलाईन वापरकर्त्यांची संख्या वाढतअसल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे.


0 टिप्पण्या