उमरखेड तालुका प्रतिनिधी :-मारोतराव गव्हाळे
उमरखेड तालुका अंतर्गत येत असलेले अभयारण्यातील चिखली वन हे गाव असून,या ठिकाणी जंगल कामगारांची संस्था कार्यरत आहे. त्या संस्थेची आमसभा चिखली वन येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिराच्या प्रांगणात ठेवण्यात आली होती.त्या आमसभेचे (मिटिंग) चे प्रशासक सचिव म्हणून श्री. आनंदा उत्तम पारधी यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या आमसभेमध्ये काही महत्वाचे विषय घायचे होते. मागील वृत वाचन करून हिशोब पाहायचा होता,मागील महिन्याचे हिशोब व सर्व लेखाजोका घ्यायचा होता. व अत्यंत
*महत्वाचा विषय म्हणजे त्या संस्थेमध्ये प्रतिनिधी ची नेमणूक करायची होती*
त्यामध्ये आपल्या माणसाची नेमणूक व्हावी. आपला जर कोरम पूर्ण झाला नाही तर, आपल्या माणसाची संस्थेमध्ये प्रतिनिधी म्हणून नेमणूक होत नाही.म्हणून त्यामधील काही प्रस्थापित सभासदांनी त्या आमसभेच्या मिटिंगमध्ये गोंधळ घालून,रजिस्टर गायब करून ती जंगल कामगारांच्या संस्थेची आमसभेची मिटिंग तहकुब करण्यास सचिव यांना भाग पाडले.आमसभा घेण्याच्या आगोदर दिलेल्या नोटीसमध्ये स्पष्ट उल्लेख केला होता कि,ही सभा काही कारणास्तव तहकूब झाल्यास किंवा काही अडचणी आल्यास तीच आमसभा त्याच दिवशी एका तासांनी घेण्यात येईल. परंतु काही प्रस्थापितानी त्या आमसभेमध्ये हेतूपरस्पर गोंधळ घालून ती आमसभा तहकूब केली. त्यानंतर त्या ठिकाणी एका तासांनी कुठलीही आमसभा घेण्यात आलेली नाही. त्यामुळे चिखली वन येथील जंगल कामगार संस्थेमधील बऱ्याच सभासदांना व गावाकऱ्यांना त्या संस्थेमधील विषयापासून व त्या समितीमधील सम्पूर्ण माहितीपासून तसेच नवीन प्रतिनिधी नेमण्यापासून परावृत्त राहण्याची वेळ आली आहे.

0 टिप्पण्या