भर पावसात शेतकरी रस्त्यावर. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचे ढाणकीत पडसाद. बाजार पेठ कडकडीत बंद.


ढाणकी प्रतिनिधी 

निसर्गाच्या मारा मुळे आधीच पिचून गेलेल्या शेतकऱ्या च्या  मुळावर आता शासन उठल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज आपल्या एकतेचे प्रदर्शन करून भर पावसात शासनाच्या धोरणाचा ढाणकीत निषेध केला. 

सकाळीच सर्व शेतकरी बांधव जुन्या बस स्टॅन्ड येथे जमा झाले. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प  हार घालून आंदोलनाला सुरवात करण्यात आली. यावेळी बोलताना शेतकऱ्यांनी आपला शासनाविरुद्ध रोष व्यक्त केला. केंद्र शासनाचे धोरण हे शेतकरी विरोधी आहे. मागील 11 महिन्यापासून तिन कृषी  कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी बांधव दिल्लीच्या सिमेवर उन,वारा ,पाउस झेलत तळ ठोकुण आहेत.  शेतकऱ्याप्रती  या सरकारची संवेदना क्षीण झाली आहे. या जगाच्या पोशीदयाला आसमानी संकटाचा सामना करत पिकवलेल्या शेतमालाची किंमत कवडीमोल दराने विक्री करावी लागत असेल तर शेतकऱ्यांच्या  सहनशीलतेचा  अंत पाहू नका. खुर्चीवर बसवीणारे आम्हीच आहोत आणि खुर्चिवरून खाली खेचण्याची ताकद आमच्या मनगटात आहे जर आपण शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण आखण्यात काम चुकार पणा कराल तर येणारा काळ आपल्या मानगुटीवर बसल्या शीवाय राहणार नाही असा घानाघाती टिकास्त्र शासनावर मान्यवरांनी बोलताना सोडले.

शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका शेतकऱ्याला बसला असून कष्ट करून पिकवलेला माल माती मोल भावाने जात आहे.   लवकरच दिवाळी येणार असून अशीच स्थिती राहिली तर शेतकऱ्या ची दिवाळी अंधारात जाईल यात शंका नाही.  या आंदोलनाला ढाणकीतील व्यापाऱ्यांनी सुद्धा प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने  दिवसभर कडकडीत बंद ठेवली.

यावेळी बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस,पोलीस  कर्मचारी निलेश  भालेराव, मोहन चाटे,सतीश चव्हाण,रवि गिते,देवीदास हाके,यांनी आपला फौजफाटा तैनात ठेवून चोख बंदोबस्त ठेवला.काही मार्गावर बॅरीगेट्स लावून मार्ग बंद ठेवला. यावेळी शहरातील शेतकरी,  प्रतिष्ठित नागरिक,  राजकीय पक्षाचे शहर प्रमुख,  कार्यकर्ते,  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या