वाघी येथील एका वृद्धावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू हिमायतनगर तालुक्यातील घटना.

 


हिमायतनगर प्रतिनिधी -दाऊ गाडगेवाड 

तालुक्यातील मौजे वाघी येथे आज दिनांक, २७ सप्टेंबर रोजी सकाळ पासूनचं संतत मुसळधार पाऊस असतानाच विठ्ठल तोलबाजी वाघमारे वय 67 वर्षे हे  सकाळी आठ वाजेच्या सुमारास घराकडून बाजूच्या शेतामध्ये भर पावसात संडास करण्यासाठी जात असताना त्यांच्या अंगावर अचानक विज कोसळली. व ते त्या ठिकाणी जागीच गत्तप्राण झाल्याचे प्रत्यक्ष दर्शनी यावेळी सांगितले. लगेच त्याच्या नातेवाईकांनी व गावकऱ्यांच्या सहकार्याने पुढील कार्यवाही साठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. व त्याच्यावर  शवविश्चेदन डॉक्टराकडून करण्याची प्रक्रिया सुरू होती. या वेळी बिट जमादार केंद्रे ,नायक चोंदते ,पोलीस पाटील आदी मंडळी या वेळी हजर होती.या घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळून  गावात  शोकलळा पसरली आहे. गावकऱ्यांकडून त्यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत महसूल विभागाकडून देण्यात यावी कारण त्याची आर्थिक परिस्थिती बेताचे आहे. तालुक्यातील लोकांनी पावसामध्ये घराच्या बाहेर  पडू नये असे आवाहन  प्रशासनाकडून केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या