वीज पडून मयत झालेल्या संतोष अंभोरे यांच्या कुटुंबियांना खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते चार लक्ष रुपयांचा धनादेश केला सुपूर्द.


महागाव तालुका प्रतिनिधी -संजय जाधव  

महागाव तालुक्यातील पिंपळगाव (सु ) येथील वीज पडून मृत्यू पावलेल्या संतोष अंभोरे यांच्या कुटुंबीयांना हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते दि. २८ रोजी आर्थिक मदत म्हणून चार लक्ष रुपयांचा धनादेश  सुपूर्द करण्यात आला. मयत संतोष अंभोरे यांच्या विधवा पत्नीचे  तात्काळ संजय गांधी निराधार योजनेत नाव नोंदविण्याचे आदेश तहसील प्रशासनास दिले.

 या वेळी गावच्या सरपंच सौ. वंदना शेषराव कांबळे, ग्रामपंचायत सदस्य संतोष पवार, दिगंबर राठोड, वसंता आडे,  नायब तहसीलदार संतोष आदमूलवड, कृषी अधिकारी विजय मुखाडे, कैलास राठोड, माजी उपजिल्हा प्रमुख के.के.कदम तालुका प्रमुख शाखा भरवाडे,शहर प्रमुख राजू राठोड,तालुका संघटक रवींद्र भारती, युवासेना जिल्हा प्रमुख विशाल पांडे,युवासेना शहर प्रमुख ओम कुसुमवर,उपतालुका प्रमुख लखन राठोड,युवासेना तालुका संघटक ऋषिकेश बलखंडे, युवासेना उपतालुका प्रमुख शुभम एडतकर, नरेंद्र राठोड, आकाश राठोड, पवन राठोड,पृथ्वीराज राठोड,ओम देशमुख व समस्त शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या