डोल्हारी ते गांजेगाव पुलादरम्यान २०० मी. रस्त्याच्या "विकास " कामाची चौकशी करा, प्रधानमंत्री आत्मनिर्भर अभियान जिल्हाध्यक्ष नागोराव शिंदे यांचा अमरण उपोषणाचा इशारा.



दाऊ गाडगेवाड- हिमायतनगर प्रतिनिधी 

हिमायतनगर तालुक्यात जे रस्त्याचे डांबरीकरण होत आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे यासाठी वर्तमान पत्रातुन रस्त्याच्या कामात अफरातफर केल्याच्या बातम्या सतत प्रकाशीत होत आहेत, परंतु याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. खासदार, आमदार साहेब तर एक प्रकारे कंत्राटदारांना मदतचं करत असल्याचे त्यांच्या कृतीतुन दिसत आहे. कारण निकृष्ट रस्त्याचे डांबरीकरण असो, सिमेंट काँक्रेटीकरण असो, नाली बांधकाम असो, स्वच्छतेचा प्रश्न असो अशा अनेक गोष्टी हिमायतनगर तालुक्यात आहेत पण या सर्व बाबतीत मौन बाळगणेच योग्य मानुन कंत्राटदारांना पाठीशी घालत आहेत. असेच जर रस्ते बनत असतील तर ग्रामीण भागातील जनतेनी कोणाकडे दाद मागायची. का ? हिमायतनगर तालचक्याचा हाच " विकास " समजायचा ? 

    

              अशाच प्रकारे डोल्हारी ते गांजेगाव पुलादरम्यान भगवती कंस्ट्रक्शने २०० मिटरचे डांबरीकरण केले होते. सदरील रस्त्याचे डांबरीकरण एप्रिल- मे २०२१ मध्ये पुर्ण करण्यात आले. केवळ तीन ते चार महीन्यातच डांबरीकरण केलेला रस्ता कुठ गेला हा प्रश्न प्रत्येकाला पडत असुन  काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्यामुळे रस्त्याला खड्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे त्यामुळे या कामाची चोकशी करून संबंधीत शाखा अभियंता, कार्यकारी अभियंता, कंत्राटदार व भगवती कंस्ट्रक्शनवर दंडात्मक कारवाई करून त्यांना यापुढे  कुठल्याही रस्त्याच्या, डांबरीकरणाची, सिमेंट काँक्रिटीकरण कामाची शासनाने निविदा देऊ नये तसेच कायमचे काळ्या यादीत टाकण्यात यावे, अन्यथा १७ सप्टेंबर  ( मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ) रोजी अमरण उपोषणास बसणार असे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद यांना प्रधानमंत्री आत्मनिर्भर अभियानाचे जिल्हाध्यक्ष नागोराव शिंदे, ज्येष्ठ पत्रकार चांदराव वानखेडे यांनी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या