गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुमेध भरणे याच्याकडुन वृक्षारोपन.

  


   दाऊ गाडगेवाड- हिमायतनगर प्रतीनिधी 

   हिमायतनगर तालुक्यात प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने प्रदुषण झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस वनराई कमी होत चालली असल्याने नवनविन रोगांना आमंत्रण देण्यास मानवाने मार्ग तयार केल्याने सर्व सजीव सृष्टिचे जीवन धोक्यात येत आहे. त्यामुळे वृक्षारोपन करण्याचा उपक्रम देशात राबवल्या जात आहे. शासनाबरोबर सामाजीक बांधलीक जपून विविध क्षेत्रातली मान्यवर मंडळी वृक्षारोपन करत आहे.


            पर्यावरणाच समतोल राखण्यासाठी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर  राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते सुमेध भरणे यांनी हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी येथे वृक्षारोपन करून पर्यावरण वाचवण्याचा संदेश जनतेला दिला आहे. यावेळी डाॅ.प्रेम वाघमारे , दता सिल्लेवाड , मुकुंद राऊलवाड, शिलवंत वाघमारे , सुभाष टेलर, राजेश राऊत, बालु लिंगमपल्ले, सुमित राऊत, आमोल सिल्लेवाड, सिद्धार्थ पाटील आदी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी  वृक्षारोपन करण्यास सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या