कोर्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात नविन रूग्णवाहीकेचे लोकार्पण
महागाव तालुका प्रतिनिधी :-संजय जाधव
उमरखेड तालुक्यातच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्यात बंदी भाग म्हणून ओळख असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र कोर्टा आरोग्य केंद्रातील रूग्णवाहीका जुनाट झाल्याने नविन रूग्णवाहीका मिळण्याबाबत उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेव ससाने निवेदनातून शासनाकडे मागणी केली होती
याबाबत विविध वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित झाल्या. सोबतच रुग्णवाहीकेच्या मागणीचा पाठपुरावा निंगणुर जिल्हा परिषद च्या जिल्हा परिषद सदस्य पंकज मुडे व पंचायत समिती सदस्य विशाखा जाधव यांनी केला. अखेर कोर्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात कायाकल्प जिल्हा खनिज प्रतिष्ठान यवतमाळ यांच्या निधी अंतर्गत नविन रूग्णवाहीका प्राथमिक आरोग्य केंद्र कोर्टा मध्ये दाखल झाली आहे.
आज 12 सप्टेंबर रोजी कोर्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात नविन रुग्णवाहीकेचा लोकार्पण सोहळा उमरखेड महागाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार नामदेव ससाने यांच्या हस्ते आज कोर्टा येथे मोठ्या दिमाखात लोकार्पण सोहळासंपन्न झाला यावेळी , या लोकार्पण सोहळा ऊमरखेड माहागाव विधानसभेचे आमदार नामदेव ससाने जिल्हा परिषद सदस्य पंकज मुडे पंचायत समिती ऊपसभापती विशाखा ताई शंकर जाधव विडुळ पंचायत समितीचे सदस्य बालाजी आगलावे प्राथमिक आरोग्य केंद्र कोर्टा चे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील दुबे डॉ. संतोष सकरगे के डॉ. प्रवीण भुसारे डॉ. शितल गुट्टे ताराचंद डोके .बाळू देशमुख. संभा आसनकर .नारयन वाघमारे. वाकडे बाबू .
महेंद्र शेळके .परमेश्वर हगवणे वाहन चालक .कोर्टा गावचे सरपंच पोलिस पाटील ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते


0 टिप्पण्या