"राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा- २०२१" स्पर्धे चे बक्षिस वितरण.

 


उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनिस यांच्या हस्ते बक्षिस प्रदान. 

उमरखेड प्रतिनिधी -

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती चे औचित्य साधून १४ एप्रिल "राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा- २०२१" डॉ. बाबासाहेब आंबेडकर-एक युग पुरुष चे आयोजन इंटरनॅशनल आयकॉन पुरस्कार प्राप्त "जिव्हाळा संस्था" उमरखेड च्या वतीने आयोजित करण्यात आले होते. स्पर्धे मध्ये वर्ग पाच ते दहा च्या विध्यार्थांसाठी या स्पर्धे चे आयोजन करण्यात आले या स्पर्धे मध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून विध्यार्थांनि फार मोठ्या प्रमानात सहभाग नोंदविला कोरोना कोविड- १९ या महामारी मुळे सर्व जगामध्ये थैमान घातले आहे. कोरोना रोगाच्या प्रादुर्भाव परिस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनी वंदन घरूनच करण्यासाठी राज्यस्तरीय वक्तृत्व  स्पर्धे चे आयोजन करून सपर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धे साठी प्रथम पारितोषिक 1500 रोहित शहाणे पूजा ज्वेलर्स उमरखेड,  दुतीय पारितोषिक 1000  दिगांबर कांबळे, खरूस उमरखेड, तुर्तीय पारितोषिक 700 शिव व्याख्याते ऍड. दिगंबर देशमुख हदगाव, व उतेजनार्थ पारितोषिक 500 नागोराव धुळे  या सर्व मान्यवरांन तर्फे ठेवण्यात आले. हि स्पर्धा जिव्हाळा संस्थे च्या अधिकृत Youtube चॅनल वर घेण्यात आली व ज्या स्पर्धकांना सर्वात जास्त लाईक व व्हिवज  मिळतील तो विजेता स्पर्धे च्या सर्व नियमा प्रमाणे राज्यातून प्रथम क्रमांक पटकनारा स्पर्धक शौर्य अमोल पुरी उमरखेड यवतमाळ, दुतीय अनुष्का परशराम कर्णेवाड  उमरखेड यवतमाळ, तुर्तीय संस्कार अवधूत वाघमारे, उमरखेड यवतमाळ उतेजनार्थ – पल्लवी अनिल राठोड – कल्याण मुंबई या सर्व स्पर्धकांना उमरखेड विभागाचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस  यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व बक्षिस रक्कम प्रदान करून सन्मानित करण्यात आले या वेळी जिव्हाळा संस्थे चे अध्यक्ष अतुल लता राम मादावार यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणात स्पर्धे विषयी सर्व माहिती दिली या वेळी विजेते शौर्य अमोल पुरी व अनुष्का परशराम कर्णेवाड या स्पर्धकाने आपले मनोगत व्यक्त करीत संस्थे चे आभार मानले त्या नंतर उपविभागीय अधिकारी कापडणीस यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून संस्थे च्या आजवरच्या सेवाभावी कार्याचे तोंडभरून कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा देत सर्व स्पर्धकांचे कौतुक केले व शुभेच्छा देत मार्गदर्शन केले या कार्यक्रमा प्रसंगी उमरखेड चे तलाठी  दतात्रय दुर्केवार, पत्रकार  संघ अध्यक्ष लक्ष्मीकांत नंदनवार, जिव्हाळा संस्थे चे अध्यक्ष अतुल लता राम मादावार, बिराजदार, पूजाज्वेलर्स चे मालक अक्षय दिलीप शहाणे, जिव्हाळा संस्था सल्लागार संगीता अतुल मादावार, स्पर्धकांचे पालक डॉ. खुशबू पुरी, डॉ. अमोल पुरी, परशराम कर्णेवाड, अवधूत वाघमारे संस्थे चे स्वयंसेवक विजय राठोड, रोहित अलमुलवार आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या